Advertisement

तौंते चक्रीवादळाचा वडाळ्यातील जलवाहिनीला फटका; ६ तासांच्या प्रयत्नांनंतर जलवाहिनी दुरूस्त

वादळांमुळं पडलेल्या झाडामुळं रस्ते वाहतुकीत अडथळे निर्माण झाले, गाड्या तुटल्या, रस्त्याच्या कडेनं जाणाऱ्या नागरिकांना याचा धोका निर्माण झाला. अशातच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहीनीला ही या वादळाचा फटका बसला.

तौंते चक्रीवादळाचा वडाळ्यातील जलवाहिनीला फटका; ६ तासांच्या प्रयत्नांनंतर जलवाहिनी दुरूस्त
SHARES

मुंबईत तौक्ते चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर मुसळधार पावसानं हजेरी लावली. जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसानं मुंबईला चांगलंच झोडपून काढलं. अनेक सखल भागात पाणी साचुन मुंबईची तुंबई झाली. परिणामी रेल्वेव रस्ते वाहतूक काही थांबली. मोठं आर्थिक नुकसान ही झालं. शिवाय, मुंबईतील अनेक परिसरात मोठ मोठी झाडं पडली. वादळांमुळं पडलेल्या झाडामुळं रस्ते वाहतुकीत अडथळे निर्माण झाले, गाड्या तुटल्या, रस्त्याच्या कडेनं जाणाऱ्या नागरिकांना याचा धोका निर्माण झाला. अशातच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहीनीला ही या वादळाचा फटका बसला.

मुंबईतील वडाळा परिसरात असलेल्या सीजीएस कॉलनी परिसरात एक मोठं झाड वादळामुळं कोसळलं. हे कोसळलेलं झाड काही गाड्यांवर पडलं तर, जमीनीखाली असलेली पाण्याची पाईपलाईनचं ही मोठं नुकसान झालं. पाणीच्या पाईपलाईन तुटल्यामुळं वडाळा सीजीएस कॉलनी परिसरात २ दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होत होता. त्यामुळं स्थानिक नागरिकांनी वॉटर टॅकरच्या सहाय्यानं पाण्याची तहान भागावली.

मात्र, याबाबत माहिती मिळताच सहाय्यक अभियंता जल कामे (तातडीचा दुरुस्ती विभाग-वरळी) या विभागानं घटनास्थळी धाव घेत. युद्धपातळीवर पाण्याच्या पाईपलाईनचं दुरूस्तीचं काम केलं. यावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या अडथळ्याचा सामना करावा लागला. कारण झाडं कोसळलं असल्यामुळं परिसरात पावसाचं पाणी साचून रस्ता जलमय झाला होता. त्यामुळं पाईपलाईनपर्यंत पोहोचणं फार कठीण झालं होतं. मात्र, ६ तासांच्या अथक प्रयत्नांनतर अखेर जलवाहिनी दुरूस्त करत पाणीपुरवठा सुरळीत केला.

'जेसीबी, अग्निशमन दल, उद्यान विभाग आणि सहाय्यक अभियंता जल कामे (तातडीचा दुरुस्ती विभाग-वरळी) व स्थानिक नागरिक यांच्या साहाय्यानं येथील कोसळलेलं झाडं बाजूला काढण्यात आलं. त्यानंतर पाण्याच्या फुटलेल्या वाहिनीची दुरूस्ती करण्यात आली. यावेळी मोठ्या अडथळ्यांचा सामाना करावा लागला. मात्र, ६ तासांच्या अथक प्रयत्नांनतर जलवाहिनी अखेर दुरूस्त करण्यात आली आणि पुन्हा पाणीपुरवठा सुरळीत करण्याच आला', अशी माहिती सहाय्यक अभियंता जल कामे विभागाचे अभियंता जीवन पाटील यांनी दिली.



हेही वाचा -

आता घरीच करा कोरोना चाचणी; वाचा कशी करायची?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना आर्थिक मदत


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा