Advertisement

मुख्यमंत्री करणार चक्रीवादळग्रस्त रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा दौरा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तौंते चक्रीवादळग्रस्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करणार आहे. मुख्यमंत्री शुक्रवार २१ मे रोजी या जिल्ह्यांना भेट देऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत.

मुख्यमंत्री करणार चक्रीवादळग्रस्त रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा दौरा
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तौंते चक्रीवादळग्रस्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करणार आहे. मुख्यमंत्री शुक्रवार २१ मे रोजी या जिल्ह्यांना भेट देऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. तसंच प्रशासनाकडून आढावाही घेणार आहेत. मुख्यमंत्री प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत नसल्याबद्दल भाजपकडून त्यांच्यावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि प्रविण दरेकर यांनी कोकणचा दौरा करून विविध मागण्या सरकारकडे केल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांचा दौरा पुढीलप्रमाणे:

सकाळी ८.३५ वाजता

रत्नागिरी विमानतळ इथं आगमन

०८.४० वा. “तौंते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक

सकाळी ९.४० वाजता हेलिकॉप्टरने चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग इथं आगमन व

मोटारीने वायरी ता. मालवणकडे प्रयाण

सकाळी १०.१० वाजता वायरी, ता.मालवण इथं “तौंते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

सकाळी १०.२५ वाजता मोटारीने मालवण इथं आगमन व “तौंते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

सकाळी ११.०५ वाजता निवती, ता. वेंगुर्ला इथं “तौंते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

या पहाणीनंतर सकाळी ११.३० वाजता चिपी विमानतळ बैठक सभागृह इथं मोटारीने आगमन व नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक

चिपी विमानतळ इथून हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रयाण

दुपारी १२.३५ वाजता रत्नागिरी विमानतळ इथून आगमन व

विमानाने मुंबईकडे प्रयाण

(maharashtra cm uddhav thackeray will visit cyclone tauktae affected sindhudurg and ratnagiri district on 21st may 2021)


हेही वाचा- 

महाराष्ट्राचंही वादळाने नुकसान, मग पंतप्रधानचा दौरा गुजरातलाच का?- नवाब मलिक


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा