अदानीचंही वीज बिल ३ हप्त्यात भरता येणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अदानी इलेक्ट्रिसिटीच्या ग्राहकांना आता दिलासा मिळणार आहे. वीज आयोगाच्या निर्देशानुसार महावितरणनंतर आता अदानी इलेक्ट्रिसिटिनंही आपल्या घरगुती ग्राहकांना जून महिन्याचे वीज बिल तीन समान हप्त्यात भरण्याची सवलत दिली आहे. वाढीव वीज बिल पाहून लोकांना चांगलाच शॉक बसला. एवढी मोठी रक्कम एकावेळी कशी भरायची अशी चिंता व्यक्त केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकांना आता तीन हप्त्यांमध्ये पैसे देण्याचा पर्याय असेल. ही सुविधा EMI मध्ये देऊन वीज बल भरू शकता. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) मार्गदर्शक सूचनांनुसार ज्यांची वीज बिले सरासरी रक्कमेपेक्षा दुप्पट आली होती. त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध असेल.

"ग्राहकांना पाठिंबा म्हणून आम्ही घरगुती वीज बिल भरण्यासाठी हप्त्यांची सुविधा देत आहोत. शिवाय यावर कुठल्याही प्रकारचा व्याज आकारला जाणार नाही. त्यामुळे ग्राहकांसाठी आहाला ही सुविधा आणण्याचा आनंद आहे. तसंच सध्याच्या परिस्थितीत मार्गदर्शन केल्याबद्दल आम्ही MERC चे आभारी आहोत, असं AMELचे मुख्य कार्यकारी अधिकारी कंदरप पटेल म्हणाले.


हेही वाचा : नवी मुंबईकरांना वीजबील हप्त्याने भरता येणार, महावितरणचा दिलासा


अदानी इलेक्ट्रिसिटीकडून मिळालेलं वीज बिल हे अधिक आहे. याचा विरोध सामान्यांपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत केला जात आहे. अनेकांनी सोशल मीडियाचा आधार घेत याविरोधात आवाज उठवला. कोरोनाव्हायरसमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांना त्यांचे विजेचे बिल प्राप्त झाले नव्हते. परंतु ग्राहकांना स्वत: रिडिंग घेऊन त्याचे फोटो पाठवण्यास सांगण्यात आलं होतं. पण ग्राहकांनी तसं केल्यानंतर अपेक्षेपेक्षा जास्त बिल आलं.

अदानी यांच्याआधी मुंबई शहरात वीज पुरवठा करणारी कंपनी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमा (बेस्ट) ने आपल्या ग्राहकांना ३ हप्त्यांमध्ये वीज बिल भरण्याची मुभा दिली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेत सुलभ हप्त्यांमध्ये वीज बिल भरण्याची मुभा देण्याचे निर्देश वीज कंपन्यांना दिले होते. 


हेही वाचा

Electricity Bill: आता EMI ने भरता येईल बेस्टचं वीजबिल

Electricity Bill: ‘वर्क फ्राॅम होम’मुळे वीजबिल वाढलं, ऊर्जामंत्र्यांचा अजब दावा

पुढील बातमी
इतर बातम्या