Advertisement

अदानी विकत घेणार मुंबई विमानतळ? 'असा' सुरू आहे प्रयत्न

अदानी समूहाने हवाई वाहतूक क्षेत्रात १८ हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असून त्यातील १० हजार कोटी रुपये खर्च करून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (MIAL) कंपनीत हिस्सा विकत घेण्याची तयारी सुरू केल्याचं समजत आहे.

अदानी विकत घेणार मुंबई विमानतळ? 'असा' सुरू आहे प्रयत्न
SHARES

अदानी समूहाने हवाई वाहतूक क्षेत्रात १८ हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असून त्यातील १० हजार कोटी रुपये खर्च करून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (MIAL) कंपनीत हिस्सा विकत घेण्याची तयारी सुरू केल्याचं समजत आहे. 

५० वर्षांचं कंत्राट

बिझनेस स्टॅण्डर्सने दिलेल्या वृत्तानुसार अदानी समूहाला फेब्रुवारी महिन्यात ६ विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचं ५० वर्षांचं कंत्राट मिळालं आहे. या कंत्राटानुसार ८ हजार कोटी रुपये अहमदाबाद, लखनौ, जयपूर, तिरुवनंतपुरम आणि मंगळुरूमधील विमानतळ विकसित करण्यासाठी गुंतवण्याचा अदानी कंपनीचा विचार आहे. 

 हिस्सा वाढणार

त्याचसोबत अदानी कंपनीला ‘एमआयएएल’मधील आपला हिस्सा देखील वाढवायचा आहे. सद्यस्थितीत अदानी कंपनीकडे ‘एमआयएएल’मधील १३.५ टक्के हिस्सा आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या जीव्ही ग्रुपकडे ‘एमआयएएल’ची ५०.५० टक्के हिस्सेदारी आहे. सोबतच बिडवेस्टकडे १३.५ टक्के आणि एसीएसए ग्लोबल लिमीटेडकडे १० टक्के हिस्सेदारी आहे. गेल्या १३ वर्षांपासून या कंपन्या एकत्रितपणे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कारभार हाताळत आहेत.

व्यवहार फिस्कटला

विमानतळाची किंमत ८ हजार कोटी गृहित धरुन बिडवेस्टने ७७ रुपये प्रती समभाग या दराने  आपल्याकडी सर्व हक्क अदानी कंपनीला १ हजार २४८ कोटींना विकण्याची तयारी दाखवली आहे. बिडवेस्टने आपल्या मालकीचा हिस्सा जीव्हीके समूहाला विकण्याचं आधी ठरवलं होतं. परंतु नियोजित वेळेत जीव्हीकेला व्यवहार पूर्ण करता न आल्याने या प्रकरणात राष्ट्रीय लवादाला लक्ष घालण्याची विनंती अदानी समूहाने केली होती. लवादाने जीव्हीके समूहाला ३१ आॅक्टोपर्यंत व्यवहार पूर्ण करण्यास सांगितलं आहे.  

याशिवाय मुंबई उच्च न्यायालयातही अदानी समूह आणि जीव्हीके समूहामध्ये वाद सुरु आहे. बिडवेस्ट आणि अदानी समूहातील व्यवहारात जीव्हीके अडथळे आणत असल्याचा आरोप अदानी समूहाने केला आहे.



हेही वाचा-

मेकर कंपनी गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांना न्यायालयानं फटकारलं

सुप्रीम कोर्टाची कोस्टल रोड कामाला स्थगिती कायम



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा