Advertisement

सुप्रीम कोर्टाची कोस्टल रोड कामाला स्थगिती कायम

कोस्टल रोडच्या कामाला मागील वर्षीच्या डिसेंबरपासून सुरूवात झाली आहे. या प्रकल्पाला मच्छीमारांनी आणि पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे.

सुप्रीम कोर्टाची कोस्टल रोड कामाला स्थगिती कायम
SHARES

सुप्रीम कोर्टाने मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला स्थगिती कायम ठेवली आहे. मच्छीमारांच्या विरोधामुळे मुंबई उच्च न्यायालयाने कोस्टल रोडच्या कामाला स्थगिती दिली होती.  उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात मुंबई महापालिकेने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. आता सुप्रीम कोर्टानेही मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. 

कोस्टल रोडच्या कामाला मागील वर्षीच्या डिसेंबरपासून सुरूवात झाली आहे. या प्रकल्पाला मच्छीमारांनी आणि पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. कोस्टल रोडमुळे मच्छीमारांच्या उपजिवीकेचे साधन असलेल्या मासेमारीवर परिणाम होणार असल्याचं म्हणत वरळी कोळीवाड्यातील मच्छीमारांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.

याविरोधात मच्छीमार आणि पर्यावरणप्रेमी मुंबई उच्च न्यायालयातही गेले. उच्च न्यायालयाने या प्रकल्पाचे काम थांबवण्याचा आदेश दिला. काम थांबल्यानंतर मुंबई महापालिकेला रोज १० कोटी रुपयांचं नुकसान होत आहे. हेही वाचा  -

मेट्रो प्रकल्पामुळं झाडांची होणारी हानी टाळण्यासाठी एमएमआरडीएमार्फत ५१ हजार वृक्षारोपण
संबंधित विषय
Advertisement