Advertisement

मेट्रो प्रकल्पामुळं झाडांची होणारी हानी टाळण्यासाठी एमएमआरडीएमार्फत ५१ हजार वृक्षारोपण


मेट्रो प्रकल्पामुळं झाडांची होणारी हानी टाळण्यासाठी एमएमआरडीएमार्फत ५१ हजार वृक्षारोपण
SHARES

मुंबईसह उपनगरात सुरू असलेल्या मट्रो प्रकल्पाच्या कामासाठी संबंधित परिसरातील अनेक झाडंचं नुकसान होत आहे. त्यामुळं या झाडांची होणारी हानी भरून काढण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत या वर्षीच्या पावसाळ्यात ५१ हजार १५१ झाडे लावण्यात आली आहेत. एमएमआरडीए, ठाणे वनविभाग आणि महाराष्ट्र वन विकास मंडळ यांच्यातील त्रिपक्षीय करारानुसार हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार वनविभागाच्या ४६ हेक्टर जमिनीवर हे वृक्षारोपण करण्यात आलं आहे.

४६ हेक्टर जागा

शिळफाटा आणि टिटवाळा येथील ठाणे वन विभागाच्या एकूण ४६ हेक्टर जागेवर ऑगस्टपासून या वृक्षारोपणास सुरुवात करण्यात आली होती. तसंच, मंगळवारी प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांच्या हस्ते डायघर नजीकच्या जागेवर ५१,१५१ झाड लावण्यात आली.


जोपासनेचा खर्च

प्रत्येक झाडामागे १ हजार २२८ रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यामध्ये ३ वर्षांपर्यंतचा जोपासनेचा खर्चाचा समावेश आहे. शिळफाट्या जवळील डायघर पोलीस ठाण्याजवळील ३६ हेक्टर जागेवर ४१ हजार १५१ झाडे, तर कल्याणजवळील १० हेक्टर जागेवर १० हजार झाडे लावण्यात आली आहेत.


वृक्षारोपणाचा निर्णय

बकुळ, पिंपळ, कडुनीम, कांचन, जांभूळ, कदंब, करंज अशा विविध झाडांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, भविष्यात मुंबई आणि महानगर परिसरात सर्व मेट्रो मार्गिकांसाठीच सुमारे ७ हजारांच्या आसपास वृक्षतोड होणार आहे. ती हानी भरून काढण्यासाठी प्राधिकरणाने प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे.



हेही वाचा -

दिंडोशी येथील डोंगरावर पुन्हा लागणार आग?

एका क्लिकवर उपलब्ध होणार लोकलचं तिकीट



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा