Advertisement

एका क्लिकवर उपलब्ध होणार लोकलचं तिकीट


एका क्लिकवर उपलब्ध होणार लोकलचं तिकीट
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता लोकलचं तिकीट प्रवाशांना केवळ एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यासाठी रेल्वे स्थानकांतील 'एटीव्हीएम'ही (ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन) जलद गतीनं कार्य करणार आहे. या एटीव्हीएम मशिनवर एकदा क्लिक केल्यास प्रवाशांना तिकीट उपलब्ध होणार आहे. त्यासाठी नव्या मशिनचा वापर करण्यात येणार असून या मशिनच्याआधारे अवघ्या एका क्लिकवर तिकीट घेता येणार आहे.

एका क्लिकवर तिकीट

सामान्य एटीव्हीएममध्ये प्रवाशांना ६ टप्प्यांनंतर तिकीट मिळतं. मात्र, यामध्ये प्रवाशांची मिनिटं वाया जात असून, अनेकदा एटीव्हीएम मशीन बंद असल्यानं प्रवाशांना रांगेत राहून तिकीट घ्यावं लागतं. परंतु, आता नव्या मशिनमधून अवघ्या एका क्लिकवर तिकीट घेता येणार आहे. रेल्वे स्थानकांतील सामान्य एटीव्हीएमच्या जागी नवीन एटीव्हीएम बसवण्यात येणार आहेत.

एटीव्हीएम हाताळण्यास सोपं

या मशिनमध्ये ५ रुपयांच्या पटीत तिकीट दर असणार आहेत. तसंच, 'सिंगल की रिटर्न' असे पर्यायही देण्यात आले आहेत. या पर्यायांवर क्लिक करताच प्रवाशांना रेल्वे तिकीट उपलब्ध होणार आहे. या मशिनमध्ये मराठीसह हिंदी आणि इंग्रजी भाषांचा समावेश करण्यात आल्यानं हे एटीव्हीएम हाताळण्यास देखील सोपं असल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली.

९२ एटीव्हीएम मशिन

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील ४२ रेल्वे स्थानकांवर एकूण ९२ एटीव्हीएम मशिन कार्यरत करण्यात येणार आहेत. त्यामुळं मुंबईकरांना रेल्वे तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट लवकर उपलब्ध होणार आहे. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना गुरुवार २४ ऑक्टोबरपासून 'वन टच' एटीव्हीएममधून तिकीट घेता येणार आहे.



हेही वाचा -

दिवाळीनिमित्त तुतारी एक्सप्रेसला चार अतिरिक्त डबे

बेस्ट कर्मचाऱ्यांचा यंदाच्याही दिवाळी बोनस रखडला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा