Advertisement

दिवाळीनिमित्त तुतारी एक्स्प्रेसला चार अतिरिक्त डबे


दिवाळीनिमित्त तुतारी एक्स्प्रेसला चार अतिरिक्त डबे
SHARES

दरवर्षी दिवळीनिमित्त शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जाते. या सुट्टीच्या आनंद लुटण्यासाठी आणि दिवाळी साजरी करण्याकरीता गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी असते. विषेशत: कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी मोठी असते. त्यामुळं या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या चालविण्यात येतात. त्यानुसार, यंदाही प्रवाशांसाठी जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेनं तुतारी एक्स्प्रेसला चार अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

४ अतिरिक्त डबे

मध्य रेल्वेकडून तुतारी एक्स्प्रेसला जोडण्यात येणाऱ्या ४ अतिरिक्त डब्यांमध्ये १ शयनयान आणि ३ साधारण डब्यांचा समावेश आहे. यामुळं कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे. तसंच बुधवारपासून ३१ ऑक्टोबर या कालावधीत ही गाडी दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ७ ऐवजी ५ वरून मार्गस्थ करण्यात येणार आहे.

गर्दीत प्रचंड वाढ

दिवाळीसाठी कोकणात जाण्याकरीता या दिवसांत तुरारी एक्स्प्रेसच्या प्रतीक्षायादीत प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळं अनेक प्रवाशांना या गर्दीतून प्रवास करावा लागतो. त्यामुळं प्रवाशांची या गर्दीपासून सुटका करण्यासाठी आणि प्रवासीहाल टाळण्यासाठी या गाडीला अतिरिक्त डबे जोडण्यात आले आहेत.

गाडी क्रमांक ११००३-११००४ दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस दादर स्थानकातील प्लटफॉर्म क्रमांक ७ वरून सुटते. परंतु, अतिरिक्त डबे जोडण्यात आल्यामुळं आता ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वरून रात्री १२.०५ ला रवाना करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे.  हेही वाचा -

Maharashtra Assembly Elections: काँग्रेसकडून ईव्हीएम बिघाडाच्या ३२१ तक्रारी

बेपत्ता मुलीचा शोध न लागल्याने चेंबूरमध्ये दंगल परिस्थितीसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा