बेपत्ता मुलीचा शोध न लागल्याने चेंबूरमध्ये दंगल परिस्थिती

मंगळवारी पंचाराम यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक अंत्ययात्रेला जमा झाले होते. अंत्ययात्रेत सामिल झालेल्या तरुणांनी सायन-पनवेल महामार्गावर अचानक दगडफेक करत रास्ता रोको केला.

SHARE
चेंबूर परिसरात बेपत्ता मुलीच्या पित्याने नैराश्येतून काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यामुळे येथील वातावरण मंगळवारी चांगलंच चिघळलं. पोलिसांना मुलीचा शोध घेण्यास अपयश आल्याने चेंबूरमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. या जमावाला पांगवायला गेलेल्या पोलिसांवर जमावाने दगडफेक केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली होती.

कुर्लाच्या ठक्कर बापा काॅलनीत पंचाराम रिठाडीया दोन मुले, मुलगी आणि पत्नीसोबत राहत होते. एकच मुलगी असल्यामुळे पंचाराम यांचा तिच्यावर जीव होता. लहानपणापासून इतर भावंडांपेक्षा ते तिचे लाड जास्त करायचे. काही महिन्यांपूर्वी त्यांची ही १७ वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली. मुलीचा शोध घेऊनही तिचा काही थांगपत्ता लागत नसल्यामुळे पंचाराम यांनी नेहरूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मुलगी पळू गेल्यामुळे पंचाराम दुखी होते. समाजात मुलगी परपुरुषासोबत पळून गेल्याची कुजबुज चालू होती. पंचाराम यांना अनेकांकडून  टोमणेही ऐकावे लागले होते. त्यामुळे नैराश्येत असलेल्या पंचाराम यांनी अखेर टोकाचं पाऊल उचललं. पंचाराम यांनी हार्बर मार्गावरील टिळकनगर रेल्वे स्थानकाजवळ धावत्या लोकलखाली स्वतःला झोकून आत्महत्या केली. 

मंगळवारी पंचाराम यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक अंत्ययात्रेला जमा झाले होते. अंत्ययात्रेत सामिल झालेल्या तरुणांनी सायन-पनवेल महामार्गावर अचानक दगडफेक करत रास्ता रोको केला. त्यामुळे अंत्ययात्रेला आलेल्या जमावामध्ये एकच धावपळ उडाल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला. काही वेळातच सायन-पनवेल महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. यावेळी जमावाने काही गाड्यांवर आणि दुकानांवरही दगडफेक केली. यावेळी दोन पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या जमावाने या पोलिसांवरच दगडफेक करत त्यांच्यावर हल्ला चढवला. जमावाने पोलिसांचा पाठलाग करत त्यांच्यावर हल्ला केल्याने या हल्ल्यात हे दोन्ही पोलिस गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी वाढीव कुमक मागवत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.हेही वाचा -

इक्बाल मिर्ची प्रकरणात हुमायू मर्चंटला अटक

प्रदीप शर्मांनी दिली निवडणूक अधिकाऱ्याला धमकी
संबंधित विषय
ताज्या बातम्या