प्रदीप शर्मांनी दिली निवडणूक अधिकाऱ्याला धमकी

मतदान केंद्रात मतदाराशी शर्मा हे बातचीत करत होते. त्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी आक्षेप घेत, शर्मा यांना टोकले. त्यातून शर्मा आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक वाद ही झाला.

SHARE

मतदान केंद्रात जबरदस्ती प्रवेश करत निवडणूक अधिकाऱ्याला धमकावणे एन्काऊन्टर स्पेशलिस्ट आणि शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांच्या अंगलट आलं आहे. या प्रकरणी विरार पोलिस ठाण्यात निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार शर्मा यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नालासोपारातील बहुजन विकास आघाडीच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेकडून प्रदीप शर्मा यांना उमेदवारी दिल्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. त्यातच आरोप-प्रत्यारोपांनी  मतदार संघातील वातावरण चांगलंच चिघळलं होतं. सोमवारी झालेल्या मतदानावेळी प्रदीप शर्मा हे विरार पूर्वेकडूल चंदनसार येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर आले होते. त्यावेळी मतदान केंद्रात मतदाराशी शर्मा हे बोलत होते. त्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी आक्षेप घेत शर्मा यांना टोकले. त्यातून शर्मा आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक वादही झाला. याच वादातून प्रदीप शर्मा यांनी निवडणूक अधिकाऱ्याला मतदान केंद्रावरच बघून घेण्याची धमकी दिली आहे. 

या प्रकरणी निवडणूक अधिकारी बाळासाहेब मालोंडे यांनी मतदान झाल्यानंतर विरार पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून भादवी 186, 504, 506, लोकप्रतिनिधी कायदा कलम 131 (1)(2), 171 (ब) प्रमाणे विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हेही वाचा  -

कमलेश तिवारीच्या हत्येमागे पाकिस्तानचा हात ?

PMC बँक घोटाळा : माजी संचालक सुरजीत सिंह अरोराच्या पोलिस कोठडीत वाढ
संबंधित विषय
ताज्या बातम्या