कमलेश तिवारीच्या हत्येमागे पाकिस्तानचा हात ?

पोलिसांनी सीसीटिव्हींच्या आधारे रशीद आणि मौलाना यांची ओळख पटली होती. रशीदच्या मोबाइल नंबरचा सीडीआर पोलिसांनी काढल्यानंतर तो नागपूरच्या सैय्यदच्या संपर्कात असल्याचे पुढे आले. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने सैय्यदला नागपूरातून अटक केली.

SHARE

हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची हत्या करणाऱ्यास महाराष्ट्र एटीएसने नागपूर येथून अटक केली आहे. सैय्यद आसीम अली (२९) असं या आरोपीचं नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तीन मारेकऱ्यांना अटक केली आहे.  रशीद पठाण, मौलाना शेख अशी इतर दोन आरोपींची नावे आहेत. या हत्येचा कट पाकिस्तानात रचला असल्याचं तपासात समोर आलं असून हत्येचा सराव गुजरातमध्ये केल्याची माहिती समोर आली आहे.

हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांनी २०१५ साली एका सभेत मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तिवारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर परिसरात तणावाचं वातावरण होतं. तिवारी यांच्या या वक्तव्याचा राग तिघांच्या मनात होता. त्यानुसार या हत्येतील मास्टर माइंड रशीद पठाण यांनी तिवारी यांचा काटा काढण्याचं ठरवलं. त्यानुसार दुचाकीवरून आलेले मारेकरी भेट वस्तू देण्याच्या नावाखाली तिवारी यांच्या कार्यालयात शिरले. त्यावेळी संधी साधून तिघांनी त्यांच्यावर गोळीबार करत तेथून पळ काढला. पळ काढणाऱ्या मारेकऱ्यांचे चित्रीकरण सीसीटिव्हीत कैद झाले.  हत्येनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिवारी यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 तिवारी यांच्या हत्येनंतर उत्तरप्रदेशच्या लखनऊ परिसरात तणावाचं वातावरण होतं. या हत्या प्रकरणाचा तपास युपी पोलिसांनी करण्यास सुरूवात केली.  पोलिसांना सीसीटिव्हींच्या आधारे रशीद आणि मौलाना यांची ओळख पटली होती. रशीदच्या मोबाइल नंबरचा सीडीआर पोलिसांनी काढल्यानंतर तो नागपूरच्या सैय्यदच्या संपर्कात असल्याचं पुढं आलं. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने सैय्यदला नागपूरातून अटक केली. सैय्यदचा ताबा एटीएसने गुजरात पोलिसांना दिला आहे. रशीद हा पूर्वी दुबईत एका कंपनीत कामाला होता. त्या कंपनीचा मालक हा पाकिस्तानी होता. त्यामुळे या हत्याकांडामागे पाकिस्तानमधील काही कट्टर पंथीयांचा हात आहे का हे आता तपासले जात आहे.हेही वाचा -

PMC बँक घोटाळा : माजी संचालक सुरजीत सिंह अरोराच्या पोलिस कोठडीत वाढ

आर्थिक घोटाळ्यांसाठी हवा स्पेशल पीपी
संबंधित विषय
ताज्या बातम्या