Advertisement

दिंडोशी येथील डोंगरावर पुन्हा लागणार आग?


दिंडोशी येथील डोंगरावर पुन्हा लागणार आग?
SHARES

गोरेगावमधील दिंडोशी येथील डोंगरावर नेहमीच आग लागते. या आगीत डोंगरावरील अनेक झाडं जळून खाक होतात. मात्र, बिल्डरांच्या फायद्यासाठी या डोंगरावरील जमीनीवर आग लावली जात असल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे. तसंच, 'ही वनसंपत्ती मतदान करू शकत नाही, त्यामुळं अशी मनमानी करून वनसंपत्तीचं नुकसान करण्यात येत असून त्याला कायदेशीर आळाही घातला जात नाही', अशी भावना नागरी निवारा येथील नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

डोंगर ओसाड

गोरेगाव येथील दिंडोशी येथील डोंगर ओसाड राहावा यासाठी प्रयत्न करण्यात येतात. आताही डोंगरावर झाडं वाढू नयेत यासाठी पावसाळ्यात रुजलेल्या बिया, रोपं साफ करण्यात आली आहेत. त्यामुळं डोंगर ओसाड दिसू लागला आहे. दरम्यान, मागील वर्षी या डोंगरावर आग लागली होती. ही आग खूप मोठी होती. त्यामुळं डोंगराजवळ राहणाऱ्या स्थानिकांमध्य भितीचं वातावरण निर्माण झालं होतं.

आगीबाबत चौकशी

या आगीबाबत चौकशी करण्यात आली होती. मात्र, पुढील कार्यवाही काय झाली याबाबत कोणतीही स्थानिकांना माहिती नसल्याचं समजतं. स्थानिकांना केवळ कार्यवाहीबद्दल आश्वासनं दिली जात होती. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होत नव्हती. डोंगवर लागलेल्या या आगीत कीटक, लहान प्राणी, सरपटणारे प्राणी मृत्युमुखी पडण्याची शक्यता वर्तवली जात होती.

आगीची जोरदार तयारी

सध्या पावसाळा सुरू असल्यानं अद्याप या ठिकाणी आग लावण्यात आलेली नाही. मात्र, आग लावण्यासाठी जोरदार तयारी झाल्याची शक्यता नागरिक व्यक्त केल्याचं समजतं. त्यामुळं डोंगरावरील कापलेली झाडं-झुडुपं बघून वनविभागानं यंदा तातडीनं कार्यवाही करावी आणि आगीपासून डोंगराला वाचवावं, असं आवाहन स्थानिकांनी केलं आहे.



हेही वाचा -

एका क्लिकवर उपलब्ध होणार लोकलचं तिकीट

बेस्ट कर्मचाऱ्यांचा यंदाच्याही दिवाळी बोनस रखडला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा