बीएमसीतील २४७ दुय्यम अभियंत्यांच्या भरतीला मंजुरी

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

मुंबई महापालिकेत २४७ दुय्यम अभियंत्यांची भरती होणार असून ही भरती प्रक्रिया राबवण्यास शनिवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यामुळे आता पुढील दीड महिन्यांत या भरतीची जाहिरात प्रक्रिया पूर्ण करून त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागण्यात येणार आहे.

संस्थेची निवड

मुंबई महापालिकेच्या नगर अभियंता विभागामार्फत खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातून दुय्यम अभियंत्यांच्या रिक्तपदांसाठी अर्ज मागवण्यासाठी महापालिकेच्यावतीने इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पसर्नल सिलेक्शन अर्थात आय.बी.पी.एस या संस्थेची निवड करण्यात आली आहे.

निवड कशाकरीता?

उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवून त्यांची परीक्षा घेऊन महापालिकेच्या निकषांनुसार पात्र उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी बनवण्यासाठी या संस्थेची निवड करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून अभियंत्यांची ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास मान्यता देणारा प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी मंजूर केला.

याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता मिळाल्यामुळे पुढील दीड महिन्यांत भरतीची जाहिरात मागवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असं नगरअभियंता चंद्रशेखर मराठे यांनी स्पष्ट केलं.

या पदांसाठी करू शकता अर्ज

  • दुय्यम अभियंता (स्थापत्य-सिविल) : १८४
  • दुय्यम अभियंता (यांत्रिकी-मॅकेनिकल, विद्युत- इलेक्ट्रीकल): ६३
  • परीक्षा शुल्क : मागासवर्गातील असेल तर ३०० रुपये
  • परीक्षा शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवार असेल ६०० रुपये


हेही वाचा-

'ड्रायव्हिंग टेस्ट'मध्ये नापास? एसटी पुन्हा देणार भरतीत संधी

राज्य शासनाची मोठी भरती, दोन वर्षांत ७२ हजार पदं भरणार!

कामगार भरतीची प्रश्नपत्रिका योग्यच, महापालिका आयुक्तांचा दावा

पुढील बातमी
इतर बातम्या