Advertisement

राज्य शासनाची मोठी भरती, दोन वर्षांत ७२ हजार पदं भरणार!

येत्या दोन वर्षांमध्ये शासनाच्या विविध विभागांमधल्या ७२ हजार पदांसाठी भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे.

राज्य शासनाची मोठी भरती, दोन वर्षांत ७२ हजार पदं भरणार!
SHARES

राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये हजारो पदे रिक्त असल्याची टीका वारंवार विरोधकांकडून केली जात होती. त्यावर आता मुख्यंमत्र्यांनी तोडगा काढला आहे. येत्या दोन वर्षांमध्ये शासनाच्या विविध विभागांमधल्या ७२ हजार पदांसाठी भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे.


दोन टप्प्यांमध्ये होणार भरती

यावेळी बोलताना मुख्यंमत्री म्हणाले की ही भरती प्रामुख्याने दोन टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. यामध्ये ५०% पदं पहिल्या टप्प्यामध्ये तर ५०% पदं दुसऱ्या टप्प्यामध्ये भरली जाणार आहेत.


पहिल्या टप्प्यात ३६ हजार पदं

पहिल्या टप्प्यामध्ये ३६ हजार पदं भरली जाणार असून त्यामध्ये कृषी विभाग, पशुसंवर्धन, ग्रामविकास, आरोग्य, जलसंपदा, बांधकाम अशा महत्त्वाच्या विभागांमधल्या पदांचा समावेश आहे. त्यामुळे विविध पायाभूत सुविधांसदर्भातील प्रलंबित योजना मार्गी लागण्याच्या दृष्टीने या मनुष्यबळाचा उपयोग होणार आहे.


पहिल्या टप्प्यातील जागा


विभागजागा
कृषी
२५००
सार्वजनिक बांधकाम
८३३७
आरोग्य
१०,५६८
गृह
७१११
नगरविकास
१५००
जलसंपदा
८२२७
जलसंधारण
२४२३
पशुसंवर्धन
१०४७
मत्स्यविकास
९०
ग्रामविकास
११,०००


दरम्यान, या जागा कशा भरल्या जाणार? त्यासाठी परीक्षा घेतली जाणार की मुलाखत? त्याचं नक्की वेळापत्रक कसं असेल? याविषयी मात्र अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच, दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जागा असतील? याविषयीही कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.



हेही वाचा

मुंबई महानगर पालिकेत पुन्हा भरती, जागा २४७

मुंबई महापालिका कामगार भरतीची परीक्षा पुन्हा होणार?


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा