Advertisement

मुंबई महानगर पालिकेत पुन्हा भरती, जागा २४७

बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास येत्या दहा दिवसांमध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु केली जाईल.

मुंबई महानगर पालिकेत पुन्हा भरती, जागा २४७
SHARES

मुंबई महापालिकेतील १३८८ कामगारांची भरती करण्यासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्यानंतर आता महापालिकेतील २४७ दुय्यम अभियंत्यांची भरती करण्यात येणार आहे. स्थापत्य (सिव्हील), यांत्रिकी(मेकॅनिकल) आणि विद्युत (इलेक्ट्रिकल) या पदांच्या रिक्त जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहेत. बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास येत्या दहा दिवसांमध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु केली जाईल.


भरतीसाठी आबीपीएस संस्थेची निवड

मुंबई महापालिकेच्या नगर अभियंता विभागामार्फत खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातून दुय्यम अभियंत्यांच्या रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यासाठी महापालिकेकडून इन्स्टिट्यूट ऑफ बँकींग पसर्नल सिलेक्शन अर्थात आय.बी.पी.एस या संस्थेची निवड करण्यात आली आहे. उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवून त्यांची परीक्षा घेऊन महापालिकेच्या निकषांनुसार पात्र उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी सादर करण्याची जबाबदारी या संस्थेवर असेल.


याआधीची भरती २०१५-१६मध्ये

यापूर्वी अभियंत्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी सन २०१३-१४ आणि त्यांनतर २०१५-१६मध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानुसार पुन्हा याच संस्थेवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासाठी या संस्थेला प्रत्येक उमेदवारामागे ३५० रुपये दिले जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून परीक्षा शुल्क घेण्यात येणार आहे. उमेदवार जर मागासवर्गातील असेल तर ३०० रुपये तर खुल्या प्रवर्गातील उमेदवार असेल तर ६०० रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार असल्याचे महापालिकेच्या नगरअभियंता विभागाने स्पष्ट केले आहे.


या पदांसाठी करू शकता अर्ज...

दुय्यम अभियंता (स्थापत्य-सिविल) - १८४ जागा
दुय्यम अभियंता (यांत्रिकी-मेकॅनिकल, विद्युत- इलेक्ट्रिकल) - ६३ जागाहेही वाचा

एअरपोर्ट अथॉरिटीची भरती प्रक्रिया, शिक्षणाची अट फक्त १२वी पास!

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा