Advertisement

एअरपोर्ट अथॉरिटीची भरती प्रक्रिया, शिक्षणाची अट फक्त १२वी पास!

१२वी पास उमेदवारांसाठी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया(AAI)ने सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. १२वी पास उमेदवारांसाठी एएआयने नवीन जागा काढल्या असून त्यासाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

एअरपोर्ट अथॉरिटीची भरती प्रक्रिया, शिक्षणाची अट फक्त १२वी पास!
SHARES

फक्त १२वीपर्यंत शिक्षण झाल्यामुळे कुठेही नोकरी मिळत नाही अशा प्रकारची तक्रार अनेकजण करताना दिसतात. अशा १२वी पास उमेदवारांसाठी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया(AAI)ने सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. १२वी पास उमेदवारांसाठी एएआयने नवीन जागा काढल्या असून त्यासाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.


२७ एप्रिलपर्यंत भरता येतील अर्ज

येत्या २७ एप्रिलपर्यंत या पदांसाठी अर्ज करण्याची मुदत एएआयने दिली आहे. ही पदं राष्ट्रीय स्तरावर भरली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत असेही सांगण्यात आले आहे.


कशी असेल अर्ज प्रक्रिया?

भरती प्रक्रियेसाठी २६ मार्चपासून २७ एप्रिलपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. शिक्षणाची अट १२वी पास ठेवण्यात आलेली आहे. तसेच वयोमर्यादा २७ ते ३२ वर्ष इतकी आहे. निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि प्रत्यक्ष मुलाखत होणार आहे.


४० हजार वेतनश्रेणी

ज्या उमेदवारांची निवड होईल, त्यांना ४० हजार ते १ लाख ४० हजार रूपयांपर्यंत वेतनश्रेणी दिली जाईल असे जाहीर करण्यात आले आहे. अर्ज करण्यासाठी www.aai.aero या वेबसाईटवर जाऊन अर्ज ऑनलाईन जमा करता येतील.जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा

https://www.aai.aero/sites/default/files/examdashboard_advertisement/GATE%20ADVT%202018.pdfहेही वाचा

सरकार शिक्षक भरती केव्हा करणार?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा