एसटीच्या सुमारे २४५१ चालक, वाहकांची गैरहजेरी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

लॉकडाऊनच्या काळात एसटी महामंडळाकडून अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक सेवा देत आहे. मुंबईसह राज्यभरात विविध ठिकाणी एसटी महामंडळाकडून सेवा दिली जात आहे. परंत, या सेवेकरीता महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी येणं गरजेचं होतं. परंतु, या बस सेवेला २ हजार ४५१ कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याची माहिती समोर येत आहे. दांडी मारणाऱ्यांमध्ये कायमस्वरुपी, तसेच हंगामी व रोजंदारीवरील एसटी चालक, वाहक समावेश आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, परिचारिका व अन्य वैद्याकीय कर्मचारी, महापालिका व मंत्रालयीन कर्मचाऱ्यांसह अन्य अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून मुंबई, ठाण्यात बस सेवा दिली जात आहे. ही सेवा देणाऱ्या चालक-वाहकांना करोनाची लागण होऊ नये यासाठी मास्क, सॅनिटायझर देण्यात आले आहेत. त्याशिवाय त्यांना ३०० रुपये प्रोत्साहन भत्ताही जाहिर केला आहे. मात्र, तरीही अनेकांनी कोरोनाच्याधास्तीनं या सेवेकडे पाठ फिरवली आहे.

हेही वाचा -  फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण, परीक्षेचाही पर्याय उपलब्ध

महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच, कारवाईचा बडगा उचलण्याचा इशाराही दिला आहे. तरीही काही कर्मचारी गैरहजरच राहिले. आतापर्यंत मुंबई सेन्ट्रल, परळ, कुर्ला, पनवेल, उरण या मुंबई विभागाच्या आगारातील ६४८ आणि ठाणे खोपट, वंदना, भिवंडी, कल्याण, शहापूर, मुरबाड, विठ्ठलवाडी, वाडा या ठाणे विभागाच्या आगारातील १ हजार ८०३ चालक, वाहक आणि चालक तथा वाहक अत्यावश्यक सेवेसाठी गैरहजर राहिल्याची मााहिती समोर येत आहे. 

हेही वाचा - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं प्रवाशांचा एसटीनं प्रवास कमी

दांडी मारणाऱ्यांमध्ये कायमस्वरुपी चालक-वाहकांची संख्याच अधिक असून मुंबई विभागातील ४६३ जणांनी दांडीच मारली आहे. मुंबई सेन्ट्रल आणि परळ आगारातील कर्मचारी पुढे आहेत. दरम्यान आता जे चालक-वाहक गैरहजर राहिले आहेत, यातील काहींचे वेतन थांबवण्याची कारवाई महामंडळानं केली आहे. यामध्ये हंगामी आणि रोजंदारीवर असलेल्यांवर बडतर्फीचाही बडगा उचलण्याचा विचार महामंडळाकडून सुरु आहे.


हेही वाचा -

एसटीने केली ५ लाखांहून अधिक स्थलांतरीत मजुरांची रवानगी

दिलासादायक: वरळी कोळीवाड्यातील 'इतके' टक्केभाग प्रतिबंधित क्षेत्राच्या यादीतून मुक्त


पुढील बातमी
इतर बातम्या