Advertisement

फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण, परीक्षेचाही पर्याय उपलब्ध

अंतिम वर्षाच्या (final year) विद्यार्थ्यांना त्यांच्या झालेल्या सर्व सेमिस्टरचे मिळालेले गुण लक्षात घेऊन सरासरी मार्क्स देत पास करून त्यांचा पुढच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण, परीक्षेचाही पर्याय उपलब्ध
SHARES

अंतिम वर्षाच्या (final year exams) विद्यार्थ्यांना त्यांच्या झालेल्या सर्व सेमिस्टरचे मिळालेले गुण लक्षात घेऊन सरासरी मार्क्स देत (final year tudents will get aggregate marks based on their performance in the previous semesters for that academic year) पास करून त्यांचा पुढच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांना हे मान्य आहे त्यांच्यासाठी हा निर्णय आहे. ज्यांना वाटतं की परीक्षा दिल्यानंतर मी यापेक्षा अधिक चांगले मार्क्स मिळवू शकलो असतो त्यांच्यासाठी  पुढे काही कालावधीने परीक्षा घेतल्या जातील, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.

शिक्षणाला महत्त्व

त्यासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आजपर्यंत शिक्षण आणि आरोग्याला कदाचित प्राधान्य दिलं गेलं नसेल. पण मला असं वाटतं की पुढचं आयुष्य जगताना जर आपण जीवनावश्यक गोष्टी या संकटाच्या काळात बंद होऊ न देता चालू ठेवल्या तसच शिक्षण सुद्धा कसं सुरू ठेवता येईल त्यावर लक्ष देण्याची गरज आहे. लॉकडाऊन शब्द बाजूला ठेऊन #MissionBeginAgain किंवा पुन:श्च हरी ओम म्हणत आहे. शाळा कधी सुरू होणार, त्यापेक्षा शिक्षण कसं सुरू होणार हे महत्वाचं आहे. शाळा हे एक माध्यम आहे.

हेही वाचा- Lockdown 5.0: महाराष्ट्र सरकारची नियमावली जाहीर, तुम्हाला वाचायलाच हवी...

सरारसरी मार्क्स

''म्हणून आपण सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला आहे की अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या झालेल्या सर्व सेमिस्टरचे मिळालेले गुण लक्षात घेऊन सरासरी मार्क्स देऊन पास करावयाचा आणि त्यांचा पुढच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ज्यांना हे मान्य आहे त्यांच्यासाठी हा निर्णय आहे. ज्यांना वाटते की परिक्षा दिल्यानंतर मी यापेक्षा अधिक चांगले मार्क्स मिळवू शकलो असतो त्यांच्यासाठी  पुढे काही कालावधीने परीक्षा घेतल्या जातील. ''

निर्णय काळजीपूर्वक

अनेक पालकांची चिंता आहे, कोविड पसरत असताना आमच्या मुलांना आम्ही परीक्षेला पाठवावं का? काही लाख विद्यार्थी परीक्षेसाठी एकत्र येणार, किती अंतर ठेवणार? याबात कुलगुरूंसोबत नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची असेल तर तातडीने परीक्षा घेण्याची परिस्थिती नाही यावर एकमत झालं. कारण, ते कुलगुरू आणि मी मुख्यमंत्री असलो तरी आमच्यातला पालक आज ही जिवंत आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निर्णय काळजीपूर्वक आणि चर्चेअंती घेतला गेला आहे. हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

शिक्षणाला प्राधान्य

शाळेपेक्षा शिक्षण सुरु करण्याला प्राधान्य असल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण-शहरी भाग, ग्रीन झोन सह राज्यात सुरु करावयाच्या शिक्षणासाठीच्या उपाययोजनाचे शासनाचे प्रयत्न  असल्याचं ते म्हणाले. प्रत्यक्ष जिथे शाळा सुरु करता येतील तिथे शारीरिक अंतराच्या व इतर उपाययोजनांसह शाळा सुरु करणे, जिथे हे शक्य नाही तिथे ऑनलाईन शाळा सुरु करणे, टॅब, लॅपटॉपच्या माध्यमातून शिक्षण देणे याबाबत येत्या काही दिवसात ठोस निर्णय घेतला जाईल हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा- लाॅकडाऊन ५.०: धार्मिक स्थळं, सलून, रेस्टाॅरंटसोबत आणखी काय सुरू होणार?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा