आयएनएस विराटच्या विक्रीचा लिलाव पुन्हा रखडला

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

भारतीय नौदलातून (Indian Navy) सेवानिवृत्त झालेली आयएनएस विराट (ही विमानवाहू युद्धनौका भंगारात काढण्याची प्रक्रिया पुन्हा रखडली आहे. आयएनएस विराट भंगारात काढण्यासाठी केलेल्या ऑनलाइन लिलावात ( अपेक्षित किंमत आली नाही. त्यामुळे हा लिलाव रखडला आहे. 

ऑनलाइन लिलावात ( ५ ते ७ कंपन्यांनी रस दाखवला. मात्र, एकाही कंपनीने अपेक्षित किंमत न दिल्याने हा लिलाव झाला नाही. आयएनएस विराट  (ची किंमत निश्चित करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने (तज्ज्ञांची समिती नेमली होती. या समितीने ७५० कोटी रुपये किंमत निश्चित केली होती. पण लिलावात (auction) सहभागी झालेल्या कंपन्यांकडून ३५० कोटी रुपयांहून अधिक किंमत मिळाली नाही. त्यामुळे पुन्हा लिलाव प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

महाराष्ट्र सरकार व आंध्र प्रदेश सरकारने आयएनएस विराट  (खरेदी करून त्याचे संग्रहालयात (रूपांतर करण्याचा प्रस्ताव दिला होता. पण नौकेची पत सांभाळली न जाण्यावरून नौदलाने त्यास परवानगी दिली नाही. मात्र, ही आयएनएस विराट तशीच उभी असून तिचा देखभाल खर्च मोठा आहे. त्यामुळे संरक्षण विभागाने भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू केली. आयएनएस विराट हलली गेल्यास किमान दोन विनाशिका किंवा तीन फ्रिगेट्स इतकी जागा उपलब्ध होणार आहे. 

'द ग्रँड ओल्ड लेडी' (The Grand Old Lady) असे बिरूद मिरवणारे हे ऐतिहासिक जहाज दीर्घकाळ भारतीय नौदल  (Indian Navy) आणि रॉयल नेव्हीच्या सेवेत होते. एप्रिल १९८६ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने HMS हार्मिसला ६.३ कोटी डॉलरमध्ये खरेदी करण्यासाठी ब्रिटनसोबत करार केला होता. HMS हार्मिसची डागडुजी आणि नवी उपकरणांची खरेदी केल्यानंतर १९८७ मध्ये ते आयएनएस विराट  (च्या रुपात भारतीय नौसेनेच्या नौकांच्या ताफ्यात दाखल केले गेले. या जहाजाचे नाव जगातील सर्वात दीर्घकाळ सेवा देणारे मोठे जहाज म्हणून गिनीज बुकात (Guinness Book) नोंद करण्यात आले आहे. 

नौदलाच्या (Indian Navy) ताफ्यातून निवृत्त ( झाल्यानंतर आयएनएस विराट (मुंबईच्या गोदीत (उभी आहे. मूळ ब्रिटीश बनावटीची ही विमानवाहू युद्धनौका १९८७ साली नौदलात दाखल झाली.  २२६.५० मीटर लांबीच्या आयएनएस विराटने श्रीलंकन बंडखोरांविरुद्धची कारवाई तसेच कारगिल युद्धावेळी (पाकिस्तानी नौदलावर वचक ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. २०१७ मध्ये आयएनएस विराट नौदलाच्या ताफ्यातून निवृत्त झाली. तेव्हापासून ती कुलाब्यातील नौदल गोदीत ( आहे. 

  • आयएनएस विराट (ही विमानवाहू युद्धनौका भंगारात काढण्याची प्रक्रिया पुन्हा रखडली 
  • ऑनलाइन लिलावात ( अपेक्षित किंमत आली नाही. त्यामुळे हा लिलाव रखडला आहे. 


हेही वाचा -

कोरिओग्राफर गणेश आचार्य पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, सह कलाकाराने दिली पोलिसांत तक्रार

'फटका गँग'ला रोखण्यासाठी रेल्वे उभारणार टेहळणी बुरूज

प्रवाशांना चाकूच्या धाकावर लुटणारे टॅक्सी चालक अटकेत


पुढील बातमी
इतर बातम्या