प्रवाशांना चाकूच्या धाकावर लुटणारे टॅक्सी चालक अटकेत

टॅक्सीबाहेर पडण्याचे प्रयत्न करू लागला मात्र टॅक्सी आतून खोलता येणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली होती.

SHARE

मुंबई (mumbai) बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना निर्जनस्थळी नेऊन चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या टॅक्सी चालकांना (Taxi driver) ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी (Police ) अटक केली आहे. नुकतेच त्यांनी विजयवाडा (Vijayawada) येथून आलेल्या दोन प्रवाशांकडून ७ हजार रुपये उकळले. फकिरा ठाकरे आणि गणेश स्वामी अशी या चालकांची नावे आहे. या दोन चालकांचा आणखी काही गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे तपासात पुढे आले असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

विजयवाडा (Vijayawada) येथून  बी. आर. एल. ट्रॅव्हल्सने गणपत रेवा राम आणि त्याचा भाऊ २५ जानेवारी रोजी मुंबईत आले. सायनहून दादर स्थानकाला जाण्यासाठी ते ठाकरेच्या टॅक्सी (taxi) बसले. ठाकरेने दादर येथे जाण्यासाठी १०० रुपये आणि सामानाचे ३० रुपये द्यावे लागतील असे सांगितले. रेवा आणि त्याच्या भावाने मीटरप्रमाणे चलण्यास सांगितले. परंतु टॅक्सीचालकाने (Taxi driver) नकार देत १३० रुपयेच द्यावे लागतील असे सांगितले. घाई असल्याने दोघे टॅक्सीमध्ये बसले. काही अंतरापर्यंत टॅक्सी गेल्यानंतर आणखी एक व्यक्ती टॅक्सीमध्ये येऊन बसला. दादर (dadar), सायन (sion) चा परिसर फिरवून प्रवाशांना घेऊन एल्फिन्स्टन पुलाजवळ घेऊन आला.

काहीतरी काळेबेरे असल्याचे जाणवू लागल्याने रेवा याने टॅक्सी (taxi) थांबविण्यास सांगितले. रेवा आणि त्याचा भाऊ टॅक्सीबाहेर पडण्याचे प्रयत्न करू लागले. मात्र टॅक्सी आतून खोलता येणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली होती. रस्त्याच्या कडेला टॅक्सी उभी करून टॅक्सीचालक (Taxi driver) आणि त्याच्या साथीदाराने  चाकूच्या धाकावर रेवा आणि त्याच्या भावाकडून प्रत्येक तीन हजार हिसकावून घेतले. तसेच याबाबत कुणाला सांगितल्यास दोघांनी ठार मारण्याची धमकी दिली. मुंबई (mumbai) त पहिल्यांदाच आल्याने घाबरलेल्या रेवा आणि त्याच्या भावाने सहा हजार रुपये दिले. रेवा याच्या पाकिटातील आणखी हजार रुपयेही टॅक्सीचालकाने काढून घेत त्यांना तिथेच सोडून पळ काढला.


या प्रकरणी रेवा आणि त्याच्या भावाने ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेवरून पोलिसांनी टॅक्सी (taxi) चा नंबर मिळवत २७ तास अविरत शोध घेऊन फकिरा ठाकरे आणि गणेश स्वामी या दोघांना शोधून काढले. त्यांनी अशाप्रकारे आणखी किती प्रवाशांना लुटले आहे याबाबत चौकशी सुरू असल्याचे ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी म्हटले आहे.हेही वाचा -

'फटका गँग'ला रोखण्यासाठी रेल्वे उभारणार टेहळणी बुरूज

कोरिओग्राफर गणेश आचार्य पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, सह कलाकाराने दिली पोलिसांत तक्रार
संबंधित विषय
ताज्या बातम्या