राज्यात मान्सून ८ जूनपर्यंत दाखल होणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईसह राज्यभरात उकाडा प्रचंड वाढला आहे. लॉकडाऊनमुळं घरी बसलेल्या नागरिकांना उकाड्यानं हैराण केलं आहे. परंतु, आता भारतीय हवामान विभादानं राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. मान्सूनचा पाऊस ८ जूनपर्यंत राज्यात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. याआधी ३० मेपासून राज्यातील विविध भागांत मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाजही भारतीय हवामान खात्यानं वर्तवला.

हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पावसाला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळं प्रचंड उष्णतेमुळं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. हवामान खात्यानं गुरुवारी मान्सून १ जूनला केरळात दाखल होणार असल्याची माहिती दिली. अरबी समुद्रात मान्सूनच्या आगमनासाठी पोषक असणारा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.

हेही वाचा - १ व २ जूनला राज्यात सर्वत्र मान्सूनपूर्व पाऊस

मालदीव-कोमोरिन परिसरात मान्सूनच्या पावसाला सुरुवातही झाली आहे. तसंच, बंगालच्या उपसागराचा परिसर व अंदमान-निकोबार बेटांच्या परिसरातही काही प्रमाणात मान्सूनच्या सरी बरसल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. साधारण साडेचार महिने पडणारा पाऊस शेतीसाठी लागणाऱ्या ७० टक्के पाण्याची गरज पूर्ण करतो. 


हेही वाचा -

कांदिवलीच्या कामगार रुग्णालयात १५० खाटांचं कोरोना रुग्णालय

आणखी एका शिपायाचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू


पुढील बातमी
इतर बातम्या