Advertisement

१ व २ जूनला राज्यात सर्वत्र मान्सूनपूर्व पाऊस


१ व २ जूनला राज्यात सर्वत्र मान्सूनपूर्व पाऊस
SHARES

पावसळ्याला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. दरवर्षी राज्यात जुनच्या पंदरवढ्यात मान्सून दाखल होतो. परंतु, यंदा लवकर म्हणजेच राज्यात १ आणि २ जूनला राज्यात सर्वत्र मोसमीपूर्व पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात पाऊस सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक असणार असल्याचा अंदाज ही हवामान विभागानं वर्तवला आहे.

यावर्षी सर्वसाधारणपणे राज्यात ११ जूनला पावसाची सुरुवात होणार आहे. त्याचा परतीचा प्रवास हा ८ ऑक्टोबरला सुरु होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणं अल निनोचा प्रभाव पावसावर पडणार नसल्याचं देखील हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. यावर्षी मराठवाड्यात सर्वसामान्य तर विदर्भात सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

दरम्यान, मुंबईत दरवर्षी जास्तीचा पाऊस झाल्यास पाणी तुंबण्याची शक्यता असते. त्यामुळं महापालिकेनं पावसाळापूर्व कामांना सुरूवात केली असून पाणी तुंबण्याच्या ठिकाणी पंप बसणविण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. त्याचप्रमाणं पावसाळ्यात मुंबईकर व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी समुद्रकिनारी सुरक्षा रक्षक ही तैनात करण्यात आले आहेत.



हेही वाचा -

घरपोच दारु हवी असल्यास परवाना आवश्यक, दिवसभरात 3691 जणांनी केले अर्ज

लॉकडाउनच्या काळात अवैध मद्यविक्री प्रकरणी 'इतके' गुन्हे दाखल



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा