मॅनहोलमध्ये महिला पडतानाचा व्हिडिओ व्हायरल, पालिकेनं दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रातील सर्व रस्त्यांवरील मॅनहोलची (Manhole) तातडीनं आणि नव्यानं तपासणी करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत. महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी हे निर्देश दिले आहेत. यासोबतच, मॅनहोल तातडीनं हटवून तिथं नवीन मॅनहोल लावण्‍यात आला आहे.

भांडूप (पश्चिम) (Bhandup) इथल्या व्हिलेज रस्त्यावर पूर्वेला असलेल्या एका मॅनहोलचे झाकण कालच्या जोरदार पावसामुळे (Mumbai Rains) निघाले होते. त्यात दोन महिला पडता पडता वाचल्‍याची चित्रफित देखील समाजमाध्‍यमांमध्‍ये आणि वृत्‍तवाहिन्‍यांमध्ये व्हायरल झाली होती.

पावसाळ्यापूर्वी कामाचा भाग म्हणून सर्व ठिकाणच्या मॅनहोलची तपासणी करून आवश्यक ती दुरूस्ती करण्यात येते. असं असलं तरी, कालच्या जोरदार पावसानंतर आणि पाण्याचा निचरा झाल्यानंतर महानगरपालिकेच्‍या वतीनं पुन्‍हा एकदा सर्व रस्‍त्‍यांची पाहणी करुन मॅनहोलची तपासणी केली जात आहे.

आवश्‍यक तिथले मॅनहोल बदलण्‍याची कार्यवाही करण्‍यात येत आहे. तसे सक्त निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.

दरम्यान, 


हेही वाचा

कोरोना रोखण्यासाठी 'मुंबई मॉडल' आता दिल्लीत राबवणार, दिल्लीतल्या मंडळाची मुंबईला भेट

मुंबई महापालिकेचा १०४ टक्के नालेसफाईचा दावा

पुढील बातमी
इतर बातम्या