मुंबईतल्या ‘त्या’ मॅनहोलमध्ये सापडलं २१ लाखांचं सोनं


मुंबईतल्या ‘त्या’ मॅनहोलमध्ये सापडलं २१ लाखांचं सोनं
SHARES

मुंबईच्या जुहू परिसरात एका अल्पवयीन चोरानं मॅनहोलमध्ये चोरी करून लंपास केलेलं २१ लाखांचं सोनं लपवल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मुंबईच्या जुहू पोलिसांनी १७ वर्षांच्या अल्पवयीन चोरट्यास अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्याने २१ लाख किंमतीच्या सोन्याची चोरी केली होती. हे सोनं लपवण्यासाठी त्याने रस्त्यातील मॅनहोलच्या झाकणाचा वापर केला. त्यानंतर हा अल्पवयीन चोरटा आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसला. दरम्यान या चोराचा पोलीस तपास करत असताना पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्याकडून २१ लाख रुपयांचे दागिने जप्त केले.

जुहू पोलीस ठाणे हद्दीतील नेहरु नगरमध्ये पूजा नावाची महिला वास्तव्यास आहे. पूजा आपल्या परिवारासह महाबळेश्वर येथे फिरायला गेल्या होत्या. महाबळेश्वर फिरुन आल्यानंतर त्या घरी परतल्या तेव्हा त्यांच्या घरात चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. तपास सुरू केला असता त्यांच्या कपाटातील २१ लाखांचं सोनं लंपास केल्याचे समजले. यामुळे त्याच्यासह कुटुंबियांना देखील मोठी धक्का बसला.

पूजा यांनी तातडीने जुहू पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी सर्व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सर्व परिस्थिती बघितली. पोलिसांना आजूबाजूच्या नागरिकांवर संशय व्यक्त करत शोध सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर तपासाचा वेग वाढवला.

चोरी करणारा हा मुलगा इयत्ता नववी नापास असून नोकरीच्या शोधात असल्याची माहिती पोलिसांना तपासात समोर आली. पोलिसांनी अल्पवयीन चोरट्याची मुलाची चौकशी केल्यावर त्याने चोरी केल्याचे मान्य केले. तसेच त्याने परिसरातील मॅनहोलमध्ये उतरुन गटारात सोनं लपवल्याचेही कबुलीत स्पष्टपणे सांगितले. सोनं चोरण्याआधी तो मोबाईल चोरी करुन तिथेच लपून ठेवायचा, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा