Advertisement

नालेसफाईच्या कामाच्या पाहणीसाठी ‘ती’ उतरली चक्क मॅनहोलमध्ये

नालेसफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी महिला आरोग्य निरीक्षक थेट मॅनहोलमध्ये उतरल्या.

नालेसफाईच्या कामाच्या पाहणीसाठी ‘ती’ उतरली चक्क मॅनहोलमध्ये
SHARES

पावसाळ्याच्या तोंडावर ठिकठिकाणी नालेसफाईच्या कामांना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. भिवंडीत (Bhivandi) नालेसफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी महिला आरोग्य निरीक्षक थेट मॅनहोलमध्ये (Manhole) उतरल्या. त्यांच्या या कृतीची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

भिवंडीतील प्रभाग समिती क्रमांक दोन अंतर्गत शांतीनगर, आझाद नगर, चावींद्रा, अवचित पाडा, खंडू पाडा या भागातील पाणी वाहून नेण्यासाठी भलामोठा नाला या ठिकाणाहून आरिफ गार्डन इथून पुढे जातो. इथल्या रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी स्थानिक वार्ड क्रमांक दोनच्या आरोग्य निरीक्षक सुविधा सुभाष चव्हाण यांच्यावर आहे.

नाल्याच्या सफाई कामावर प्रत्यक्ष हजर राहून देखरेख करत असताना नक्की काम किती झाले हे पाहण्यासाठी, सुविधा चव्हाण या थेट मॅनहोलमधून भल्यामोठ्या नाल्यात उतरल्या. किती काम झालं, नक्की काय काम झालं हे पाहण्यासाठी एक महिला अधिकारी नाल्यात उतरली याचं सर्वांकडून कौतुक केलं जात आहे.

आयुक्तांनी नुकतीच माझी नियुक्ती प्रभारी आरोग्य निरीक्षक पदावर केली आहे. आपलं काम प्रामाणिकपणे करावंच, पण ते आपलं कर्तव्य आहे या भावनेतून मी काम केलं. त्यासाठीच मी नाल्यात उतरले, अशी प्रतिक्रिया सुविधा सुभाष चव्हाण यांनी दिली.



हेही वाचा

मुंबईच्या पूर्व उपनगरांत १७ कोटींची नालेसफाई

मुंबई तुंबली, पालिका आयुक्तांनी आणि महापौरांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा