Advertisement

मुंबई महापालिकेचा १०४ टक्के नालेसफाईचा दावा

मुसळधार पावसात मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी विशेष दखल घेतली जाते. मात्र काही केल्या मुंबईत पाणी तुंबतच. त्यामुळं सर्व स्थरावरून महापालिकेवर टीका केली जाते.

मुंबई महापालिकेचा १०४ टक्के नालेसफाईचा दावा
SHARES

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी (mumbai rains) मुंबई महापालिकेकडून (bmc) नालेसफाईचं काम केलं जातं. मुसळधार पावसात मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी विशेष दखल घेतली जाते. मात्र काही केल्या मुंबईत पाणी तुंबतच. त्यामुळं सर्व स्थरावरून महापालिकेवर टीका केली जाते. परंतु, यंदा महापालिकेनं मुंबईतील मोठ्या नाल्यांतील तब्बल १०४ टक्के गाळ उपसला असल्याचा दावा केला आहे. मोठ्या नाल्यांमधून पावसाळापूर्व (mumbai rains) उद्दिष्टाच्या तुलनेत अधिक म्हणजे १०४ टक्के गाळ उपसा करण्यात आला आहे.

महानगरपालिकेच्या पर्जन्य जल वाहिन्या विभागाच्या माध्यमातून दरवर्षी मुंबई महानगरातील मोठ्या नाल्यांची स्वच्छता करण्यात येते. पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करताना किती गाळ उपसणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करून दरवर्षी उद्दिष्ट निश्चित केले जाते. मुंबई महानगरातील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन, पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्यांमधून गाळ काढण्याबाबतचे उद्दिष्ट ठरविले जाते. या आधारावर यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत ३५ टक्के अधिक गाळ काढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. ते महानगरपालिकेनं यशस्वीपणे पूर्ण केले असल्याचा दावा महापालिका प्रशासनानं केला आहे.

मुंबईत दरवर्षी पावसाळ्याच्या आधी नाल्यांतून ७५ टक्के गाळ उपसा केला जातो, १० टक्के गाळ उपसा पावसाळ्यात तर १५ टक्के गाळ उपसा पावसाळ्यानंतर केला जातो. पावसाळ्याआधीचा ७५ टक्के गाळ उपसा करण्याचे काम मे महिन्याअखेरीस पूर्ण झाले असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. पावसाळ्यापूर्वी एकूण ३ लाख ११ हजार ३८१ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट महानगरपालिकेने यंदा समोर ठेवले होते. त्या तुलनेत ३ लाख २४ हजार २८४ मेट्रिक टन इतका गाळ काढून १९ हजार ९३ इतक्या वाहन फेऱ्यांद्वारे तो वाहून नेण्यात आला आहे.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १७ हजार २९७ मेट्रिक टन गाळ काढण्यात आला आहे. नालेसफाई नसून हातसफाई असल्याचा आरोप आमदार आशिष शेलार यांनी या पूर्वी केला होता.



हेही वाचा - 

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत पाणी कमी तुंबणार - महापालिका

लोकल गाड्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचं काम धीम्या गतीनं


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा