Advertisement

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत पाणी कमी तुंबणार - महापालिका

दरवर्षी मुंबईत जास्तीचा पाऊस झाल्यास मुंबईची तुंबई होते. पावसाचं पाणी साचल्यानं रस्ते व रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळं नालेसफाईचा दावा करणाऱ्या महापालिकेवर मोठ्या प्रमाणात टीका केली जाते.

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत पाणी कमी तुंबणार - महापालिका
SHARES

दरवर्षी मुंबईत जास्तीचा पाऊस (mumbai rains) झाल्यास मुंबईची तुंबई होते. पावसाचं पाणी साचल्यानं रस्ते व रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळं नालेसफाईचा दावा करणाऱ्या महापालिकेवर (bmc) मोठ्या प्रमाणात टीका केली जाते. मात्र यंदा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी मुंबई महापालिका सज्ज आहे. पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी सुरू असलेली कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसात पाणी साचणारच नाही, असे म्हणता येणार नाही. मात्र, केलेल्या कामांमुळे ते मागील वर्षीपेक्षा कमी प्रमाणात साचेल, असा दावा पालिकेचे (bmc) अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केला आहे.

मुंबईत मेट्रोची ट्रायल रन सुरू आहे. यादरम्यान कोणताही अपघात होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी आणि याबाबतचे प्रशिक्षण महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मेट्रो कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. या कार्यक्रमानंतर काकाणी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईत ११ जूनला पाऊस येईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

त्यानुसार महापालिकेनं आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. नालेसफाईचे काम पावसाआधी पूर्ण केले जाईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. मुंबईत ज्या ठिकाणी पाणी साचते तिथे पंप लावण्यात आले आहेत. भुयारी टाक्या बांधण्याचे कामही वेगाने सुरू आहे. भुयारी टाक्यांमध्ये पाणी साठवले जाईल. समुद्राची भरती ओसरली की, पाणी समुद्रात सोडले जाईल. हिंदमाता इथं सुरू असलेले काम अंतिम टप्यात आहे. या परिसरात दरवर्षीपेक्षा कमी प्रमाणात पाणी साचेल.

मेट्रोची ट्रायल रन डी.एन.नगर ते दहिसर या ठिकाणी केली जात आहे. यादृष्टीने आपत्तीच्या वेळी कोणती खबरदारी घेण्यात यावी यासाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. सुमारे अडीच हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार असून गेल्या २ दिवसांत ४० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.



हेही वाचा - 

रविवारी मुंबईत ७९४ नवे रुग्ण; २० कोरोनाबधितांचा मृत्यू

बेस्ट १०० टक्के प्रवासी क्षमतेनं धावणार


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा