Advertisement

बेस्ट १०० टक्के प्रवासी क्षमतेनं धावणार

मुंबईत सोमवारपासून पुन्हा एकदा १०० टक्के प्रवासी संख्येने बेस्ट बस धावत आहेत.

बेस्ट १०० टक्के प्रवासी क्षमतेनं धावणार
SHARES

वाढत्या कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात लावण्यात आलेलं लॉकडाऊन आता हळूहळू शिथिल करण्यात येत आहे. त्यानुसार, मुंबईत सोमवारपासून पुन्हा एकदा १०० टक्के प्रवासी संख्येने बेस्ट बस धावत आहेत. त्यामुळं बेस्ट प्रवाशांनाही दिलासा मिळाला आहे. बेस्ट बसगाड्यांमधील पूर्ण आसनक्षमतेनुसार प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी दिल्याची माहिती बेस्ट उपक्रमानं दिली. उभे राहून प्रवास करण्यास बंदी असेल.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध आले. त्यात बेस्टबसमधूनही ५० टक्के  प्रवासी क्षमतेनुसार वाहतूक करण्याची परवानगी दिली होती. यामध्ये एका आसनावर एक प्रवासी व उभ्याने प्रवासी न घेण्याचा नियम होता. सर्वसामान्यांसाठी लोकल बंद, बेस्ट मार्गावरील एसटी गाड्याही कमी झाल्याने प्रवासी पूर्णपणे बेस्टवरच अवलंबून राहिले. परंतु ५० टक्के  प्रवासी क्षमतेनुसार बस धावत असताना अनेक गैरसोयिंचा सामना प्रवाशांना करावा लागला.

ऐन गर्दीच्या वेळी चालक, वाहक प्रवास नाकारत असल्याने प्रवासी त्यांचे न ऐकताच बसमध्ये प्रवेश करत होते. त्यामुळे काही मार्गावरील बसगाड्यांना गर्दी होत होती. त्यात एका आसनावर २ प्रवासी किंवा उभ्यानंही प्रवासी प्रवास करत असल्यानं वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होत होते. मात्र सोमवारपासून १०० टक्के  आसनक्षमतेनुसार बसगाडय़ा चालवल्या जाणार असल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

मुंबईत रविवारी ७९४ नव्या रुग्णांची नोंद झाली तर २० रुग्णांचा मृत्यू झाला. तर एका दिवसात ८३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.१३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधी ५२७ दिवसांपर्यंत वाढला आहे. गेल्या आठवड्याभरापासून मुंबईतील दैनंदिन रुग्णांची संख्या हजाराखाली स्थिरावली आहे.

रविवारी ७९४  नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ७ लाख ११ हजारापुढे गेली आहे. एका दिवसात ८३३ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत ६ लाख ७८ हजाराहून अधिक  म्हणजेच ९५ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली आहे. सध्या १६ हजार ७० उपचाराधीन रुग्ण आहेत.


हेही वाचा - 

महाराष्ट्रात ७ जूनपासून अनलॉक, ५ टप्प्यात लॉकडाऊन हटवणार

महाराष्ट्र अनलॉक : सोमवारपासून काय सुरु, काय बंद?


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा