Advertisement

मुंबईकरांना राणीच्या बागेला लवकरच भेट देता येणार

मागील काही महिन्यांपासून बंद असलेल्या भायखळा येथील राणीच्या बागेला लवकरच भेट देता येणार आहे.

मुंबईकरांना राणीच्या बागेला लवकरच भेट देता येणार
SHARES

मागील काही महिन्यांपासून बंद असलेल्या भायखळा (byculla) येथील राणीच्या बागेला लवकरच भेट देता येणार आहे. यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 'द मुंबई झू' या ऑनलाइन व्यासपीठावर लवकरच राणीच्या बागेचे आभासी पर्यटन (व्हर्च्युअल टूर) सुरू होणार आहे. त्याची एक झलक (ट्रेलर) शनिवारी सकाळी १० वाजता महापौरांच्या (mumbai mayor) हस्ते प्रसिद्ध झाली. भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात लॉकडाऊनमुळं गेले दीड वर्ष मुंबईकरांना पाऊल टाकता आलेले नाही. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी ‘द मुंबई झू’ नावाने बागेचे ऑनलाइन व्यासपीठ निर्माण करण्यात आले.

‘द मुंबई झू’च्या माध्यमातून दिनविशेषांनुसार विविध व्याख्याने आयोजित केली जात आहेत. तसेच बागेतील प्राणी-पक्ष्यांची थोडक्यात सचित्र माहिती दिली जात आहे. याचेच पुढील पाऊल म्हणून सुरू होणाऱ्या आभासी पर्यटनात अधिकाधिक माहिती दृकश्राव्य फितींद्वारे दिली जाईल. शनिवारी प्रसिद्ध झालेली झलक पाहताना त्यात राणीच्या बागेतील हिरवाईसोबतच तेथील जैविक संपदेचे वैविध्य अनुभवता येत आहे.

जगभरातील ७ पैकी ६ खंडांतील झाडे राणीच्या बागेत आहेत. दुर्मीळ भारतीय वनस्पतीही आहेत. तसेच १ अस्वल, १ बारशिंगा, २ वाघ, २ तरस, २ बिबटे, ४ कोल्हे, ४ पाणगेंडे, ५ पेंग्विन, ४० हरणे, विविध प्रकारचे कोळी, फु लपाखरांसारखे कीटक, पक्षी आहेत. हे सर्व वन्यवैभव प्रेक्षकांना घरबसल्या अनुभवता येईल.




हेही वाचा - 

महाराष्ट्रात ७ जूनपासून अनलॉक, ५ टप्प्यात लॉकडाऊन हटवणार

महाराष्ट्र अनलॉक : सोमवारपासून काय सुरु, काय बंद?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा