Advertisement

लोकल गाड्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचं काम धीम्या गतीनं

मुंबईतील रेल्वे प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. वाढत्या संख्येमुळं गुन्ह्यांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे.

लोकल गाड्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचं काम धीम्या गतीनं
SHARES

मुंबईतील रेल्वे प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. वाढत्या संख्येमुळं गुन्ह्यांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. त्यामुळं या घटनांपासून प्रवाशांचं संरक्षण करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं लोकल गाड्यात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला होता. लोकलमधील (mumbai local) महिला डब्यात सीसीटीव्हींबरोबरच ‘टॉक बॅक’ यंत्रणा बसविण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेकडून घेण्यात आला होता. परंतु ३ वर्षांनंतरही प्रकल्प धीम्या गतीने पुढे सरकत आहे. पश्चिम रेल्वेच्या (western railway) १०० लोकल गाड्यांपैकी ४७ गाड्यांमधील महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ९ डब्यांत ‘टॉक बॅक’ यंत्रणा आतापर्यंत बसवण्यात आली आहे.

सीसीटीव्हीमुळं (cctv) लोकलमधील गुन्ह्याचा उलगडा होण्यास मदत मिळेल, तर डब्यात असलेल्या स्पीकरमार्फत महिला प्रवासी गार्ड किंवा मोटरमनशी संवाद साधून तात्काळ मदत मागू शकते, यासाठी ‘टॉक बॅक’ यंत्रणा बसवण्यात येत आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी १२३ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र त्याचा गैरवापर होण्याची शक्यता, होणारा खर्च, यंत्रणा हाताळण्यासाठी गार्ड, मोटरमनसोबतच रेल्वे सुरक्षा दलावर पडणारा ताण इत्यादींमुळे ‘टॉक बॅक’ यंत्रणेचा विस्तार केला जाणार नसल्याचं पश्चिम रेल्वेकडून (western railway) नंतर स्पष्ट करण्यात आले होते.

येत्या काही वर्षांत वातानुकूलित लोकल गाड्या दाखल होणार असल्याने ही यंत्रणा केवळ याच गाड्यांमध्ये असेल, असे स्पष्ट के ले होते. परंतु वातानुकूलित लोकल प्रकल्प काहीसा मागे पडला. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे व ‘टॉक बॅक’ यंत्रणा पुढे सरकवण्याचा निर्णय घेतला. महिला प्रवाशांच्या मदतीसाठी ‘सखी’ हा ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’ही तयार करण्यात आला. यात महिला प्रवासी संघटना, महिला रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी, महिला लोहमार्ग पोलीस, रेल्वेतील महिला अधिकारी सदस्य आहेत. असे ९ ‘सखी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’ असून ७५० हून अधिक महिला सदस्य आहेत. तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये ‘मेरी सहेली’ योजना लागू केली. प्रवासातील समस्यांबाबत या योजनेतून मदत केली जाते.



हेही वाचा - 

मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा, यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

लोअर परेल परिसरातील १५ झाडांवर कुऱ्हाड, अज्ञातांविरोधात पालिकेकडून गुन्हा दाखल


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा