लोअर परेल परिसरातील १५ झाडांवर कुऱ्हाड, अज्ञातांविरोधात पालिकेकडून गुन्हा दाखल

अज्ञातांनी जवळपास १५ झाडं तोडल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

लोअर परेल परिसरातील १५ झाडांवर कुऱ्हाड, अज्ञातांविरोधात पालिकेकडून गुन्हा दाखल
Representative Image
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी)नं लोअर परळ इथल्या एनएम जोशी मार्ग पोलिस ठाण्यात अनोळखी लोकांविरोधात वृक्षतोड केल्याची तक्रार दाखल केली आहे. अज्ञातांनी जवळपास १५ झाडं तोडल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

फिनिक्स मिल्सच्या समोरील ही झाडं २० फूट उंच असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तथापि, झाडांच्या हॅकिंगमुळे त्यांची केवळ 6 फूट उंच  वाढी शकली.

रस्त्यावर असलेल्या जाहिरातींचे होर्डिंग्स दिसत नसल्यानं झाडे बेकायदेशीरपणे कापण्यात आली, असा दावा विरोधी पक्षनेते करत आहेत. याप्रकरणी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील पालिकेकडे तक्रार केली. त्यानंतर पालिकेनं पोलिसात तक्रार दाखल केली.

रविवारी भाजपचे एमएलसी प्रवीण दरेकर यांनी भाजपाचे शहराध्यक्ष आणि आमदार मंगल प्रभात लोढा यांच्यासमवेत या ठिकाणी भेट दिली.

“एकीकडे आज ऑक्सिजनची कमतरता आहे आणि दुसरीकडे ऑक्सिजनचे स्त्रोत असलेली झाडे तोडली जात आहेत. आम्हाला यावर उत्तर हवं” असं दरेकर म्हणाले.

या आरोपाला उत्तर देताना पालिका अधिकाऱ्यानं एका वृत्तपत्राला सांगितलं की, “होर्डिंग्ज रेल्वेच्या जमीनीवर आहेत. आम्ही रेल्वे अधिकाऱ्यांना याबाबच कळवलं आहे.”

मुंबईतील झाडांसाठी पालिकेनं नुकतेच एक ट्री सर्जन नियुक्त केले आणि चक्रीवादळ टॉक्टेच्या परिणामानंतर त्यांच्या संवर्धनासाठी तक्ता तयार करण्यात आला आहे.



हेही वाचा

केमिकल कंपनीत भीषण आग, १७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

इन्स्टाग्रामची मैत्री नडली, अल्पवयीन मुलीवर तीन ठिकाणी सामूहिक बलात्कार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा