Advertisement

मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा, यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्यानं अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा, यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
File Image
SHARES

मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्या(IMD)नं अतिवृष्टीचा (Heavy Rain) इशारा दिला आहे. सर्व यंत्रणेनं, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिले.

अतिवृष्टीच्या (Monsoon) या काळात आवश्यक तिथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात कराव्यात, ओएनजीसी सह इतर केंद्रीय संस्थांना या काळात होणाऱ्या अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगण्यात यावं असंही ते यावेळी म्हणाले.

हवामान खात्यानं दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीनं मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, किनारपट्टी भागात होणाऱ्या या अतिवृष्टीची माहिती स्थानिक प्रशासनानं नागरिकांनाही द्यावी, या काळात नद्यांचा प्रवाह बदलतो आणि त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरते हे लक्षात घेऊन प्रशासनानं नागरिकांची काळजी घ्यावी.

अतिवृष्टी झाल्यास वीज पुरवठा (Electricity) खंडित होऊ शकतो हे लक्षात घेऊन रुग्णालयांनी पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी, असं त्यांनी सांगितलं. सोबतच जनरेटर्स, डिझेलचा साठा, ऑक्सीजन (Oxygen) चा साठा करून ठेवावा. वीजेचे बॅकअप कशा पद्धतीनं घेता येईल याची पर्यायी व्यवस्था करून रुग्णसेवेत कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. तसंच अतिवृष्टीमुळे कोविड केअर सेंटर्समधील (Covid Care center) रुग्णांना अडचण होणार नाही, पाणी साचणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.

बैठकीत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी लहान आणि मोठ्या नाल्यांची केलेली स्वच्छतेची कामे, मोठ्या नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण याची माहिती दिली. ते म्हणाले की, यावर्षी पाणी साचू शकेल अशा ठिकाणी ४७४ पंप बसवण्यात आले आहेत. याद्वारे साचलेल्या पाण्याचा निचरा केला जाईल.

हिंदमाता (Hindmata)च्या परिसरात दोन मोठे टँक केले असून यामध्ये परिसरात साचलेले पाणी वळते करून साठवण्याची व्यवस्था केल्याचे ते म्हणाले. प्रत्येक वार्डात मनपाच्या ५ शाळा तयार ठेवल्या असून गरजेनुसार लोकांना तिथं स्थलांतरीत केले जाईल असंही ते म्हणाले.



हेही वाचा

आनंदवार्ता : महाराष्ट्रात मान्सून दाखल

पवईतील सायकल ट्रॅकचं काम प्रगतीपथावर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा