Advertisement

मुंबई तुंबली, पालिका आयुक्तांनी आणि महापौरांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली. त्यामुळे मुंबई महापालिकेचा १०४ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा फोल ठरल्याचंही दिसत आहे.

मुंबई तुंबली, पालिका आयुक्तांनी आणि महापौरांनी दिली 'ही' प्रतिक्रिया
SHARES

मुंबई रात्रीपासून सुरू असलेला पाऊस अद्यापही कोसळत आहे. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली. त्यामुळे मुंबई महापालिकेचा १०४ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा फोल ठरल्याचंही दिसत आहे. यावर महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) आणि पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal singh chahal) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबईत पाणी भरणारच नाही, असा दावा कोणीच केलेला नाही आणि आम्ही असा करणार सुद्धा नाही असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. त्या म्हणाल्या की, पूर्वी २ ते ५ दिवस मुंबई ठप्प व्हायची. पण आता तसं होत नाही. दहिसर मिलन सब वे, हिंदमाता कायम पाण्याखाली जाते, पण आता पाणी साचलेलं नाही. पाण्याचा निचरा झाला आहे. चार तासात पाण्याचा निचरा होतो, हे स्पष्ट आहे. हाय टाईड असेल तर पाण्याचा निचरा थोडा उशीरा होतो.  आज एकाच वेळी हायटाईड आणि सतत मुसळधार पाऊस यामुळे पाणी तुंबलं आहे. 

तर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल म्हणाले की, १२ तासात १४० ते १६० मिली पाऊस झाला. २४ तासात ५०० मिली पाऊस झाला की अतिवृष्टी म्हणतात. पण एका तासातच १०० हून अधिक मिली पाऊस झाला आहे. दहिसर सब वे, चुनभट्टी येथे पाणी साचले. हिंदमातामध्ये यावेळी चार फूट उंचीचे रोड तयार केले. यामुळे प्रथमच हिंदमाताची वाहतूक थांबलेली नाही. १४० कोटींचा भूमिगत प्रकल्प सुरू आहे. तिथे पाणी साचू देणार नाही. दीड किमीपर्यंत हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यास ३० दिवस लागणार आहे. इथून पुढे कधीच पाणी साचणार नाही. ऑक्टोबरमध्ये प्रकल्प सुरू केला. जानेवारीमध्ये ऑर्डर दिली. प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे, असंही चहल यांनी म्हटलं आहे.

पालिकेतर्फे गांधी मार्केटला मोठी पाईपलाईन टाकत आहोत. ३० मिली पेक्षा अधिक पाऊस एका तासात पडला की पाणी साचायला लागते. यामुळे ड्रेनेजमधून पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागणारच ना, असं चहल यांनी म्हटलं.



हेही वाचा -

ब्लॅक फंगसच्या भितीपोटी नागरिकांची झाडांवर कुऱ्हाड, अफवा पसरवू नका

मास्कविना फिरणाऱ्या ३,४३४ जणांवर कारवाई

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा