Advertisement

मास्कविना फिरणाऱ्या ३,४३४ जणांवर कारवाई

कोरोना बधितांना योग्य उपचार मिळावे यासाठी अनेक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

मास्कविना फिरणाऱ्या ३,४३४ जणांवर कारवाई
SHARES

कोरोनाला (coronavirus) मुळापासून नष्ट करण्यासाठी महापालिका अनेक प्रयत्न करत आहे. कोरोना बधितांना योग्य उपचार मिळावे यासाठी अनेक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. शिवाय, कोविड केंद्रात असलेल्या रुग्णांची ही विशेष काळजी घेतली जात आहे. त्याचप्रमाणे महापालिका (bmc) नागरिकांच्या सुरक्षेसाठी वारंवार मास्कचा वापर करा, आवाहन करत आहे. मात्र तरीही अनेक मास्कचा वापर टाळत आहेत. मुंबईत साडेतीन हजार लोकांविरोधात मुखपट्ट्या न लावल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. दिवसभरात ३,४३४ नागरिकांकडून ६ लाख ८६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

फेब्रुवारीत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर पालिकेने मास्कविना फिरणाऱ्या नागरिकांविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. कारवाई करण्यासाठी मार्शल्सची संख्याही वाढविण्यात आली. दररोज २५ हजार जणांवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले होते. त्यानुसार पालिकेचे क्लिन अप मार्शल व पोलीस आणि रेल्वे हद्दीतही मोठ्या संख्येने ही कारवाई कडक केली. आता मात्र रुग्णसंख्या जसजशी कमी होऊ लागली तसतशी ही कारवाई कमी होऊ लागली.

एका बाजूला नागरिकांना २ मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र दुसरीकडे मुखपट्टीविना फिरणाऱ्यांविरोधातील कारवाई मात्र कमी झाल्याचे चित्र आहे. तर लॉकडाऊनमुळे रेल्वे परिसरातील कारवाई पूर्णत: थांबली आहे. दरम्यान, मुलुंडमध्ये एका दिवसात केवळ ६ नागरिकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. तर देवनार, गोवंडीत केवळ १३ जणांकडून दंड वसूल के ला आहे. तर सर्वाधिक कारवाई वडाळा, सायनचा भाग असलेल्या एफ उत्तर विभागातून ३५३ लोकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.



हेही वाचा - 

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत पाणी कमी तुंबणार - महापालिका

लोकल गाड्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचं काम धीम्या गतीनं


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा