Advertisement

राज्यात मंगळवारी १६,५७७ कोरोना रूग्ण बरे

राज्यात आतापर्यंत एकूण ५५,८०,९२५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.३५ टक्के झालं आहे.

राज्यात मंगळवारी १६,५७७ कोरोना रूग्ण बरे
SHARES

महाराष्ट्रात रोज नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.  राज्यातील रूग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात मंगळवारी १० हजार ८९१ नवीन रुग्ण आढळले. तर १६ हजार ५७७ रूग्ण बरे झाले आहेत. तसंच २९५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण ५५,८०,९२५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.३५ टक्के झालं आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७३ टक्के आहे.

 राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६९,०७,१८१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,५२,८९१ (१५.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११,५३,१४७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,२२५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,६७,९२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा