Advertisement

मुंबई उपनगरातील नागरिकांना दिलासा, गोरेगावमध्ये 'इथं' नवं ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरू

स्‍थानिक आमदार तथा माजी मंत्री रवींद्र वायकर Ravindra Vaikar) यांच्‍या हस्‍ते या केंद्राचं उद्घाटन झालं.

मुंबई उपनगरातील नागरिकांना दिलासा, गोरेगावमध्ये 'इथं' नवं ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरू
SHARES

कोव्हिड प्रतिबंधक लसीकरणासाठी गोरेगाव (Goregaon) पूर्वेकडी पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ (Western Express) ओबेरॉय मॉल (Oberoi Mall) इथं ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र (Drive In Vaccination Center) सुरू करण्‍यात आलं आहे. स्‍थानिक आमदार तथा माजी मंत्री रवींद्र वायकर Ravindra Vaikar) यांच्‍या हस्‍ते या केंद्राचं उद्घाटन झालं.

कोव्हिड-19 (Coronavirus) विषाणू संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजनांचा एक भाग म्‍हणून बृहन्मुंबई महानगरपालिका लसीकरण केंद्रांची संख्‍या वाढवत आहे. याचाच एक भाग म्‍हणून ड्राईव्ह इन अर्थात वाहनांतून येवून, वाहनांत बसूनच पात्र नागरिकांना लस घेण्‍याची व्यवस्था करण्‍यात येत आहे.

राज्‍याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार गजानन कीर्तिकर, आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक ५१ चे नगरसेवक स्वप्निल टेंबवलकर यांच्‍या प्रयत्‍नातून हे ड्राइव्‍ह इन लसीकरण केंद्र सुरू करण्‍यात आलं आहे. स्‍थानिक आमदार तथा माजी मंत्री रवींद्र वायकर यांनी या केंद्राचं उद्घाटन केलं.

या उद्घाटनावेळी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कोव्हिड संसर्ग प्रतिबंध नियमांचे पालन करून, कोणताही समारंभ आयोजित न करता मोजक्‍याच मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत या Drive In Vaccination सेंटरचं लोकार्पण करण्‍यात आलं.

विशेषत: अपंग नागरिक आणि ज्येष्ठांना रांगेत उभे न राहता वाहनात बसून कोरोना लस घेता येत आहे. दादरमध्ये (Dadar) देशातील हे पहिलेच ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ केंद्राला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर पालिकेकडून १४ ठिकाणी अशाप्रकारे ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरू केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.

मुंबईतील (Mumbai) दादर परिसरातील कोहिनूर टॉवर (Kohinoor Tower) येथील पार्किंगमध्ये ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलं होतं. अपंगांना आणि ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभे न राहता लस घेता यावी, या उद्देशानं या केंद्राची स्थापना करण्यात आली. यावेळी ज्यांना लस घ्यायची आहे, त्यांनी एका पार्किंग गेटनं आत जायचे. त्यानंतर गाडीमध्येच बसून लस घ्यायची आणि मग वेगळ्या एक्झिट पॉईंटमधून बाहेर पडायचे, असा ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’चा प्लॅन असतो.



हेही वाचा

१८ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना केंद्राकडून मोफत लस

देशभरात लसीकरणामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा