Advertisement

हॉटेल-रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांचंही आत होणार लसीकरण

मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, हॉटेल, रेस्टॉरंटमधील कामगारांचे प्राधान्याने लसीकरण करण्याचं ठरवलं आहे.

हॉटेल-रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांचंही आत होणार लसीकरण
SHARES

कोरोनाला (coronavirus) आळा घालण्यासाठी लसीकरण हा एकमेव जालीम उपाय आहे. त्यामुळं देशभरात लसीकरणावर मोठा भर दिला जात आहे. मात्र, लसींचा तुटवडा हा त्यातील मोठा अडसर आहे. यासाठी लसीकरणाचा प्राधान्यक्रम ठरवला जात आहे. या आता मुंबई महानगरपालिकेने (bmc) महत्त्वाचा निर्णय घेतला असून, हॉटेल, रेस्टॉरंटमधील कामगारांचे प्राधान्याने लसीकरण करण्याचं ठरवलं आहे. मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंटमधील १८ वर्षांवरील सर्व कामगारांचं लसीकरण करण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेने या लसीकरणासाठी नियोजनही सुरू केलं आहे. यानुसार महापालिकेनं आयुक्तांनी सर्व २४ वॉर्डांमधील हॉटेल, रेस्टॉरंटमधील कामगारांची एकूण संख्या सोमवारपर्यंत कळवण्याचे आदेश सहायक आयुक्तांना दिले आहेत. ही आकडेवारी आली की त्यानुसार लसीकरणाचे टप्पे आणि नियोजन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या ७ जूनपासून ५ टप्प्यात अनलॉक (Maharashtra) करण्यात येणार आहे. कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन ५ टप्पे ठरवण्यात आले आहेत. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी काही दिवसांपूर्वी अनलॉकबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर ४ जूनला मध्यरात्री याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार निर्बंधांबाबत पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. यात पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात जे जिल्हे येणार आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. दर आठवड्याला कोरोना स्थितीनुसार हे जिल्हे बदलणार आहेत.

पहिला टप्पा जिथे ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ टक्के ऑक्सिजन बेड आहेत, तिथ लॉकडाऊन राहणार नाही. मॉल्स, हॉटेल्स, दुकाने यांना वेळेचे बंधन नाही. इतकंच नाही तर पहिल्या टप्प्यात क्रीडांगण, खासगी आणि शासकीय कार्यालये पूर्ण सुरू होतील, चित्रपटगृह सुरू होतील.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा