Advertisement

मीरा- भाईंदरमध्ये दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण केंद्र

मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या दिव्यांग नागरीकांसाठी विशेष लसीकरण केंद्र सुरु करण्यात आलं आहे.

मीरा- भाईंदरमध्ये दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण केंद्र
SHARES

मीरा भाईंदर महापालिका (Mira Bhayander Municipal Corporation) क्षेत्रात राहणाऱ्या दिव्यांग नागरीकांसाठी (disabled people) विशेष लसीकरण केंद्र (Special corona vaccination center) सुरु करण्यात आलं आहे. भाईंदर पूर्व येथे हे विशेष लसीकरण केंद्र बुधवारी २ जूनपासून सुरू झालं आहे. बुधवारी या लसीकरण केंद्रात पालिका आयुक्त दिलीप  ढोले, सभापती मीना कांगणे, लसीकरण अधिकारी डॉ. अंजली पाटील आदींच्या उपस्थितीत लसीकरण केंद्रास सुरवात झाली. पहिल्या दिवशी १६३ दिव्यांगांना लस देण्यात आली  

महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी असते. गर्दीत उभे राहण्यास दिव्यांग नागरीकांना अडचणीचं होत आहे. पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी ही बाब लक्षात घेऊन दिव्यांगांसाठी लसीकरणाची स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निर्देश दिले होते . त्यानुसार आता भाईंदर पूर्वेच्या तलाव मार्गावरील महापालिकेच्या स्व . मोरेश्वर पाटील भवन येथील तळ मजल्यावर असलेल्या सभागृहात सकाळी १० ते दुपारी ४ ह्या वेळात स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरु केलं आहे. दिव्यांगांना या केंद्रात थेट येऊन लस घेता येणार आहे. लस घेण्यासाठी येताना दिव्यांगांना दिव्यंगत्वाचा दाखल सोबत आणावा लागणार आहे . 

मिरा-भाईंदर पालिका क्षेत्रात १८ वर्षावरील ६५१ तर ४५ वर्षावरील ३७६ असे एकूण १०२७ दिव्यांग नागरीक राहत आहेत. त्यापैकी १८ वर्षावरील १६४ आणि ४५ वर्षावरील १५ अशा १७९ दिव्यांग नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं.  तर यापूर्वी ४५ वर्षावरील ४६ दिव्यांग नागरीकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.हेही वाचा -

देशभरात लसीकरणामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक

शुभवार्ता! केरळमध्ये दाखल होतोय मान्सून

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा