Advertisement

शुभवार्ता! केरळमध्ये दाखल होतोय मान्सून

केरळमध्ये गुरुवार ३ जून रोजी मान्सून दाखल होत आहे. गेल्या काही दिवसांपासूनच दक्षिण - पश्चिम मान्सून केरळमध्ये पोहचणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

शुभवार्ता! केरळमध्ये दाखल होतोय मान्सून
SHARES

केरळमध्ये गुरुवार ३ जून रोजी मान्सून दाखल होत आहे. गेल्या काही दिवसांपासूनच दक्षिण - पश्चिम मान्सून केरळमध्ये पोहचणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. केरळमध्ये यंदा मान्सून सामान्य परिस्थितीपेक्षा थोड्या उशिरानं दाखल होत असल्याचं, भारतीय हवामान विज्ञान विभागाचं म्हणणं आहे.

२ दिवस उशिरानं दाखल होत असला तरी आता येत्या काही तासांत केरळमध्ये रिमझिम पावसाला सुरूवात होऊ शकते. उपग्रहाच्या माध्यमातून मिळालेल्या फोटोंतून केरळच्या तटावर आणि त्याला लागून असलेल्या दक्षिण - पूर्व अरब सागरात ढग पसरलेले दिसून येत आहेत.

आयएमडीच्या म्हणण्यानुसार, केरळमध्ये येत्या २४ तासांत स्थिती मान्सूनसाठी अधिक अनुकूल होण्याचा पूर्वानुमान आहे. केरळमध्ये गेल्या ३ दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे.

तुमच्या राज्यात कधी दाखल होणार?

केरळ : ३ जून

महाराष्ट्र : ११ जून

तेलंगणा : ११ जून

पश्चिम बंगाल : १२ जून

ओडिशा : १३ जून

झारखंड : १४ जून

बिहार आणि छत्तीसगड : १६ जून

उत्तराखंड - मध्य प्रदेश : २० जून

उत्तर प्रदेश : २३ जून

गुजरात : २६ जून

दिल्ली - हरयाणा : २७ जून

पंजाब : २८ मे

राजस्थान : २९ जून

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा