Advertisement

ब्लॅक फंगसच्या भितीपोटी नागरिकांची झाडांवर कुऱ्हाड, अफवा पसरवू नका

सोशल मीडियावर अफवा पसरवण्यात येत आहे की, ब्लॅक फंगस हा झाडांमुळे पसरत आहे.

ब्लॅक फंगसच्या भितीपोटी नागरिकांची झाडांवर कुऱ्हाड, अफवा पसरवू नका
SHARES

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांची वाढती संख्या आता काही प्रमाणात नियंत्रणात आली आहे. पण कोरोनानंतर आता म्युकोरमायकसेस नावाच्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. याला ब्लॅक फंगस (Black Fungus) नावानं देखील ओळखलं जातं. याच परिणाम नागरिक भितीपोटी चुकिच्या अफवा पसरवत असल्याचं देखील समोर आलं आहे.

सोशल मीडियावर अफवा पसरवण्यात येत आहे की, ब्लॅक फंगस हा झाडांमुळे पसरत आहे. अशा अफवा पसरल्यानं अनेक नागरिकांनी झाडं तोडण्यास (Tree Cutting) सुरुवात केली आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर बर्‍याच वापरकर्त्यांनी पोस्ट्स शेअर केल्या आहेत. त्या आधारावर नाशिकमधील नागरिकांनी रोखण्यासाठी झाडे तोडण्यास सुरवात केली आहे.

या संदर्भात स्पष्टीकरण देताना नाशिकचे उप वनसंरक्षक पंकज गर्ग यांनी एएनआयला सांगितलं की, "काळ्या बुरशीच्या भीतीमुळे काही नागरिक झाडे तोडत आहेत. या रोगाचा झाडाशी काही संबंध नाही. ही बुरशी वातावरणात आहे. सतत वाफ घेणं, सतत ऑक्सिजनचा वापर आणि स्टिरॉइड्स ही ब्लॅक फंगसची प्रमुख कारणं आहेत."

 त्यांनी हे देखील सांगितलं की बुरशीमुळे लोकांना त्रास होऊ शकतो असे बरेच मार्ग आहेत परंतु हे झाडांपासून पसरत नाही आणि झाडं तोडणं हा उपाय नाही.

दरम्यान, हन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी)नं लोअर परळ इथल्या एनएम जोशी मार्ग पोलिस ठाण्यात अनोळखी लोकांविरोधात वृक्षतोड केल्याची तक्रार दाखल केली आहे. अज्ञातांनी जवळपास १५ झाडं तोडल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

फिनिक्स मिल्सच्या समोरील ही झाडं २० फूट उंच असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तथापि, झाडांच्या हॅकिंगमुळे त्यांची केवळ 6 फूट उंच  वाढी शकली.

रस्त्यावर असलेल्या जाहिरातींचे होर्डिंग्स दिसत नसल्यानं झाडे बेकायदेशीरपणे कापण्यात आली, असा दावा विरोधी पक्षनेते करत आहेत. याप्रकरणी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील पालिकेकडे तक्रार केली. त्यानंतर पालिकेनं पोलिसात तक्रार दाखल केली.



हेही वाचा

लोअर परेल परिसरातील १५ झाडांवर कुऱ्हाड, अज्ञातांविरोधात पालिकेकडून गुन्हा दाखल

आरेकडून वन विभागास मिळाला ८१२ एकर जागेचा ताबा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा