Advertisement

मुंबईत ११३ टक्के नालेसफाईच्या दाव्याचे तीन तेरा वाजले- आशिष शेलार

मुंबईत ११३ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी केला होता. आयुक्तांच्या या दाव्याचे पावसाने अखेर तीन तेरा वाजवलेच!

मुंबईत ११३ टक्के नालेसफाईच्या दाव्याचे तीन तेरा वाजले- आशिष शेलार
SHARES

मुंबईत ११३ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी केला होता. आयुक्तांच्या या दाव्याचे पावसाने अखेर तीन तेरा वाजवलेच! हे होणारच होतं, कारण ४० टक्क्यांपेक्षा जास्त नालेसफाई झालेली नाही. आता कुठे आहेत ते ११३ टक्क्यांचा दावा करणारे? कोट्यवधीची कंत्राटे देऊन कंत्राटदारांची पाठराखण करणारे सत्ताधारी आता गायब झालेत का? असा प्रश्न विचारत भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी मुंबईत ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यावरून सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य (bjp leader mla ashish shelar criticised bmc nala safai in mumbai during monsoon) केलं आहे.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, कालपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचं मुंबईकरांनी पाहिलं. आयुक्त दावा करत होते की ११३ टक्के नालेसफाई केली. त्यावेळी मी २२७ टक्के सांगतोय की तुमचा दावा फोल, अशा शब्दांत आयुक्तांना आव्हान दिलं होतं. कंत्राटदारांना पाठिशी घालणारे सत्ताधारी आणि अधिकारी हे यामागचे खरे दोषी आहेत. म्हणून मुंबईकरांचा जीव असुरक्षित करू नका, दोषी कंत्राटदारांना पाठिशी घालू नका. मुंबईत तुंबलेल्या पाण्याचं सत्ताधाऱ्यांना उत्तर द्यावंच लागेल, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी सत्ताधारी आणि महापालिका अधिकाऱ्यांवर निशाणा साधला.

हेही वाचा- ‘या’ परिसरात साचलं पाणी, पोलिसांनी वाहतुकीसाठी रस्ते केले बंद

मुंबईत मागील २४ तासांत मुसळधार पावसाची सांताक्रूझ इथं ९७ मिमी आणि कुलाबा इथं १२२ मिमी नोंद झाली आहे. तसंच, पुढील ४८ तासांत २०० मिमी पावसाची नोंद होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत गेल्या २ दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबईतल्या दादार टीटी, हिंदमाता परिसर, माहीम, सायन, किंग्ज सर्कल, एस.व्ही.रोड अंधेरी, खार सब वे, वांद्रे, चांदीवली परिसरात गुडघाभर पाणी साचल्यामुळे या मार्गांवरील वाहतूक ही थांबवण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.  

पाणी साचलेल्या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी पाण्याचा निचरा करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे. पाण्याचा निचरा वेगाने होण्यासाठी पालिकेने या परिसरात पंपही लावलेले आहेत. परंतु जोरदार पाऊस झाल्यास सखल भागात पाणी साचतच आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीला ब्रेक लागल्याने ठिकठिकाणी वाहतूककोंडी होत आहे. परिणामी अनेक मार्गांवरची वाहतूक वळवण्यात आली आहे.

हेही वाचा- दो दिन प्लीज सतर्क रहे, हवामान खात्याचा पुन्हा इशारा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा