Advertisement

दो दिन प्लीज सतर्क रहे, हवामान खात्याचा पुन्हा इशारा

हवामान खात्याने पुन्हा ट्विट करून आज (बुधवारी) आणि गुरुवारी मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

दो दिन प्लीज सतर्क रहे, हवामान खात्याचा पुन्हा इशारा
SHARES

मुंबईत मंगळवारपाठोपाठ  बुधवारीही सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर हवामान खात्याने दोन दिवस सतर्क राहण्याचा इशारा मुंबईकरांना दिला आहे. हवामान खात्याने पुन्हा ट्विट करून आज (बुधवारी) आणि गुरुवारी मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून सतर्क राहण्याचा सूचना मुंबईकरांना केली आहे. मुंबई की बारिश... दो दिन प्लीज सतर्क रहे... मौसम विभाग, असं ट्विट होसाळीकर यांनी केलं आहे.   कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याच्या सूचना या आधीच देण्यात आल्या आहेत. तसंच मच्छिमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्यास सांगण्यात आलं आहे.

बुधवार आणि गुरूवारी मुसळधार पाऊस झाल्यास मुंबईतील अनेक सखल भागात पाणी तुंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होऊ शकते. रेल्वे आणि परिवहन सेवांना सतर्क राहण्याच्या सूचनाही हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत.हेही वाचा -  

मुंबईत पुढील ४८ तासांत २०० मिमी पावसाचा अंदाज

ऑगस्टमध्ये उपनगरी रेल्वेगाड्या सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार - अस्लम शेख
संबंधित विषय
Advertisement