टिळक ब्रीजवरील खड्डा ठरतोय धोकादायक

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळं शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मुंबईतील महामार्ग, छोटे रस्ते अशा प्रकारच्या सर्वच ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे. पावसाच्या संततधारेमुळं या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचत आहे. असाच एक मोठा खड्डा दादर परिसरातील टिळक ब्रीजवर पडला आहे. हा खड्डा मोठा असून या खड्ड्यामुळं अपघात होण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या 'जी उत्तर' विभागातील टिळक पुलावर वाहनांची मोठी वर्दळ असते. परंतु, ऑगस्टमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं टिळक ब्रीजवर खड्ड्यांच साम्राज्य निर्माण झालं आहे. त्यामुळं या पुलावरून वाहन चालवताना प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे. त्यामुळं महापालिकेच्या 'जी उत्तर' विभागानं याकडं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.

टिळक पुलावरील रस्त्याच्या कडेला व मध्यभागी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मुंबईतील अनेक पूल दुरस्ती करता बंद करण्यात आले आहेत. त्यामुळं एल्फिन्स्टन आणि टिळक पुलावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. मात्र, या खड्ड्यांच्या साम्राज्यामुळं प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे. या खड्ड्यांमुळं अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.

याआधी अनेक दुचाकी स्वारांचा रस्त्यांवरील खड्ड्यांत पडून मृत्यू झाला आहे. त्यामुळं महापालिकेनं विशेष लक्ष्य देण्यास सुरूवात केली होती. परंतु, मुंबईवर यंदा कोरोनाचं संकट असल्यानं रस्त्यावरील खड्ड्यांकडं महापालिकेचं दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

पावसामुळं मुंबईतील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली असून महापालिकेनं बांधलेल्या रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरूवात झाली असून, नागरिकांच्या तक्रारी ही दाखल होत आहेत. गतवर्षी पालिकेने ‘खड्डे दाखवा, पाचशे रुपये मिळवा’ अशी अनोखी योजनाही राबवली होती. यंदा लॉकडाऊनमुळं आधीच रस्त्यावरील वाहतूक तुलनेत कमी आहे. मात्र, तरिही खड्ड्यांच्या तक्रारी होतच आहेत. त्यामुळं महापालिका याकडं विशेष लक्ष देत का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


हेही वाचा -

बाप्पाच्या विसर्जनासाठी यंदा ४४५ विसर्जनस्थळं सज्ज

वांद्रे-कुर्ला संकुलात युलु ई-बाईक सुविधा


पुढील बातमी
इतर बातम्या