मुसळधार पावसामुळे ठप्प झालेली उपनगरीय लोकल ट्रेन सेवा हळुहळू पूर्वपदावर येत आहे. रेल्वे ट्रॅकवरील पाणी काही प्रमाणात कमी झाल्याने मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील ट्रेन अंशत: सुरू करण्यात आहेत. परंतु या लोकल अतिशय विलंबाने सुटत असल्याने प्लॅटफाॅर्मसहीत ट्रेनमध्ये प्रवाशांची चांगलीच गर्दी झाली आहे.
मध्य रेल्वेवर कुर्ला स्थानकातून तब्बल ६ तासानंतर ठाण्यासाठी पहिली विशेष लोकल सोडण्यात आली. तर पश्चिम रेल्वेवर २ तासांनी अंधेरीहून चर्चगेटकडे लोकल रवाना करण्यात आली आहे. या दोन्ही लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने आॅफिसहून घरी जाण्याच्या घाईत असलेल्या चाकरमान्याचे चांगलेच हाल होत आहेत.
चर्चगेट ते अंधेरी मार्गावर दर अर्ध्या तासाला एक अशाप्रकारे लोकल सोडण्यात येत आहे. वसई ते अंधेरी दरम्यानच्या चारही लाइन्स सुरू झाल्या आहेत. परंतु वसई ते विरारमधील लोकलसेवा अजूनही ठप्पच आहे. आॅफिसमधून सुटलेले शेकडो कर्मचारी सीएसएमटी, चर्चगेट, भायखळा, दादर, अंधेरी, परळ, ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर स्थानकात खोळंबले आहेत. त्यामुळे या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे.
हेही वाचा-
मुंबई, ठाणे, रायगडमध्ये रेड अलर्ट, १३०० जणांना सुरक्षित स्थळी हलवलं
रेल्वे प्रवासात स्टंट केल्यास ५ वर्षांची शिक्षा