Advertisement

मुंबई, ठाणे, रायगडमध्ये रेड अलर्ट, १३०० जणांना सुरक्षित स्थळी हलवलं

येत्या ४८ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वतर्वत हवामान खात्याने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.

मुंबई, ठाणे, रायगडमध्ये रेड अलर्ट, १३०० जणांना सुरक्षित स्थळी हलवलं
SHARES

येत्या ४८ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वतर्वत हवामान खात्याने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. तसंच मुंबईकरांनी समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहनही हवामान खात्याने केलं आहे.

हेही वाचा- मुंबईतील पावसाच्या लाइव्ह अपडेट्ससाठी इथं क्लिक करा

मिठी नदी परिसरात पूरस्थिती

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई, दादर आणि पालघर या भागात जोरदार पाऊस पडत आहे. अंधेरी, गोरेगाव, सायन, हिंदमाता, किंग्ज सर्कल, कुर्ला येथील सखल भागांत पाणी साचलं आहे. मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदीकाठावरील भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कुर्ला पश्चिमेकडील विमानतळ परिसरातील क्रांती नगर पाण्याखाली गेल्याने एनडीआरएफच्या पथकानं तेथून आतापर्यंत १३०० रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे.

रेल्वे सेवा ठप्प

विक्रोळी-कांजूरमार्ग दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेवरील ठाणे-मुंबई सीएसएमटी रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ठाणे-कर्जत, ठाणे-कसारा दरम्यानची वाहतूक सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिलीआहे. तर पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वाहतूकही उशिराने सुरु आहे. तर वेस्टर्न आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक संथगतीने सुरू आहे. मुसळधार पावासामुळे मुंबई, ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.



हेही वाचा-

मुसळधार पावसामुळं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

गणेश मंडळांनी वीजप्रवाह बंद ठेवावा, समितीचं आवाहन



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा