३१ डिसेंबरच्या सर्व पोलिसांच्या सुट्ट्या तसेच साप्ताहिक सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. हे लक्षात घेऊन मुंबईत तैनात असलेला प्रत्येक पोलिस अधिकारी ड्युटीवर असेल, अशी बातमी एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.
शुक्रवारी पोलिसांच्या सर्व सुट्ट्या आणि साप्ताहिक सुट्या रद्द करण्यात आल्या असून मुंबईत तैनात असलेला प्रत्येक पोलिस कर्मचारी ड्युटीवर हजर राहणार आहे. खलिस्तानी संघटना शहरात दहशतवादी हल्ले करू शकतात अशी माहिती मिळाली आहे. त्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत, असं मुंबई पोलिसांनी म्हटल्याचं ट्विट एएनआयनं केलं आहे.
खलिस्तानी संघटना मुंबईत दहशतवादी हल्ले घडवू शकतात अशी माहिती पोलिसांना मिळाली, त्यामुळे पोलीस सतर्क झाले आहेत.
या संदर्भात, मुंबई रेल्वेचे पोलीस आयुक्त क्वेसर खालिद यांनी स्पष्ट केलं की, “मुंबईतील सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील प्रमुख स्थानक, दादर, वांद्रे चर्चगेट, सीएसएमटी, कुर्ला आणि इतर स्थानकांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. उद्या 3000 हून अधिक रेल्वे अधिकारी तैनात केले जातील.
याशिवाय, शहरातील वाढती कोविड-१९ प्रकरणं लक्षात घेता, मुंबई पोलिसांनी ३० डिसेंबर ते ७ जानेवारी या कालावधीत सीआरपीसी कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
त्यामुळे रेस्टॉरंट्स, हॉटेल्समधील बंद किंवा मोकळ्या जागेत पार्ट्यांचा समावेश असलेल्या नवीन वर्षाचे उत्सव ३० डिसेंबर ते ७ जानेवारी या कालावधीत बार, पब, रिसॉर्ट्स आणि क्लबला मनाई करण्यात आली आहे.
शिवाय, ३१ डिसेंबर रोजी मुंबईतील सार्वजनिक ठिकाणेही बंद ठेवण्यात आली आहेत. याशिवाय, नवीन व्हेरिएंटच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर वांद्रे रेक्लेमेशन इथलं "वांद्रे वंडरलँड" गुरुवार, ३० डिसेंबर ते रविवार, २ जानेवारीपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.हेही वाचा