Advertisement

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'बांद्रा वंडरलँड' बंद

मुंबईच्या बांद्रा रेक्लामेंशन परिसरात ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशनचं औचित्य साधत आकर्षक रोषणाई करत 'बांद्रा वंडरलँड' साकारण्यात आलं आहे.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'बांद्रा वंडरलँड' बंद
(Twitter/@ANI)
SHARES

मुंबईच्या बांद्रा रेक्लामेंशन परिसरात ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशनचं औचित्य साधत आकर्षक रोषणाई करत 'बांद्रा वंडरलँड' साकारण्यात आलं आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेमधून 'बांद्रा वंडरलँड' साकारण्यात आला आहे. मात्र आता हे 'बांद्रा वंडरलँड' नागरिकांसाठी बंद करण्यात आलं आहे.

मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता 'बांद्रा वंडरलँड' बंद करण्यात आलं आहे. ३० डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळं नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.

वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. बुधवारी मुंबईमध्ये कोरोनाचे २ हजार ५१० नवीन रुग्ण आढळून आल्यानंतर पोलीस व महापालिका प्रशासन सतर्क झालं आहे. मुंबईत गुरुवारी सकाळी मुंबई पोलिसांनी शहरामध्ये कलम १४४ लागू करत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळं गुरुवार ३० डिसेंबरपासून ते पुढचा शुक्रवारपर्यंत ७ जानेवारीपर्यंत हे आदेश लागू असतील असं सांगण्यात आलं आहे.

मुंबईमध्ये लागू करण्यात आलेल्या या आदेशामुळे आता ५ पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमता येणार नाही. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच पार्श्वभूमीवर मुंबईत नववर्षांच्या स्वागतानिमित्त मोकळ्या किंवा बंदिस्त जागेमध्ये पार्टी, स्नेहसमारंभ वा अन्य कोणत्याही उपक्रमाच्या आयोजनास बंदी करण्यात आली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा