आफ्रिकेतून आलेल्या ४६६ प्रवाशांची कोरोना चाचणी निगेटिव्ह, तरीही

(File Image)
(File Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार (BMC) १२ नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एकाही प्रवाशाची कोविड-१९ साठीची चाचणी पॉझिटिव्ह आढळली नाही.

तथापि, पालिकेनं RT-PCR चाचण्यांच्या दुसर्‍या फेरीसाठी त्यांचे नमुने गोळा केले आहेत. १०० शहरातील रहिवाशांचे अहवाल बुधवारी १ डिसेंबरला येणं अपेक्षित आहे, असं अधिकाऱ्यानं सांगितलं.

ओमिक्रॉनच्या भीतीनं, प्रशासकिय संस्थेनं गेल्या २० दिवसांत प्रवासी आणि उच्च-जोखीम असलेल्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. सुमारे ४६६ प्रवाशांनी विमानातून प्रवास केला. हे सर्व प्रवासी महाराष्ट्राचे रहिवासी असून गेल्या एका महिन्यात ते मुंबई विमानतळावर उतरले.

नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दुसऱ्या देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना विमानतळावर RT-PCR चाचण्या करणे आवश्यक आहे. त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास, त्यांना संस्थात्मकरित्या अलग ठेवण्यात येईल आणि त्यांचे नमुने जीनोमिक सिक्वेन्सिंग लॅबमध्ये पाठवले जातील.

दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या कोविड-पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने जीनोम अनुक्रमासाठी पाठवण्यात आले आहेत. सुमारे पाच दिवसांनी अहवालाचा निकाल येईल.

जागतिक स्तरावर कोविड-१९ चे ओमिक्रॉन या नवीन प्रकाराच्या उदयामुळे, पालिकेनं असं विधान केलं की मुंबईतील इयत्ता १ ते ७ वीच्या शाळा आता १ डिसेंबरऐवजी १५ डिसेंबरपासून पुन्हा सुरू होतील.


हेही वाचा

ठाण्यात एकाच वृद्धाश्रमातील १२ जणांना कोरोनाची लागण

कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटवर किती प्रभावी?

पुढील बातमी
इतर बातम्या