Advertisement

दक्षिण आफ्रिकेतून ७ जण आले ठाण्यात, पालिकेची शोधमोहिम सुरू

आफ्रिकेतून ठाण्यात आलेल्या ७ प्रवाश्यांचा शोध घेण्याची मोहिम ठाणे महापालिकेनं राबवण्यास सुरुवात केली आहे.

दक्षिण आफ्रिकेतून ७ जण आले ठाण्यात, पालिकेची शोधमोहिम सुरू
SHARES

दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर आता ठाण्यात ७ जण दक्षिण आफ्रिकेतून आली आहेत. १४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर दरम्यान ही ७ जण साऊथ आफ्रिकेतून (south africa) ठाण्यात आले आहेत अशी माहिती ठाणे पालिका (thane municipal corporation) आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी दिली.

आता या ७ जणांची शोध मोहीम पालिकेनं सुरू केली आहे. ज्यांच्यात लक्षणे आढळतील त्यांची तपासणी आणि विलगीकरण करण्याचे काम पालिका करणार आहे.

दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा व्हेरियंट डेल्टापेक्षा घातक असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं दक्षता बाळगण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन आणि ठाणे मनपा प्रशासनाला दिले आहेत.

त्यानुसार दक्षिण आफ्रिकेतून ठाण्यात आलेल्या ७ प्रवाश्यांचा शोध घेण्याची मोहिम ठाणे महापालिकेनं राबवण्यास सुरुवात केली आहे. या सातही जणांची आरटीपीसीआर तपासणी केली जाणार आहे. यात पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचे नमूने जिनोम सिक्वेसींगसाठी पाठवण्यात येणार असल्याचे ठाणे पालिकेचे आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी सांगितलं.

भारतात कोरोनाची लाट एकीकडे ओसरत असताना दक्षिण आफ्रिका, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रिया या देशांमध्ये दर दिवशी ३० हजारांपेक्षा जास्त लोक कोरोनाग्रस्त झालेले आढळत आहेत. ओमायक्रॉन विषाणुचे ५० पेक्षा जास्त म्युटेशन आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्देशानंतर राज्य सरकार कामाला लागले आहे.

राज्य सरकारनं सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना दक्षता घेण्यासाठी विदेशातून येणाऱ्या प्रवाश्यांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर १४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर दरम्यान जवळपास सात जण दक्षिण आफ्रिकेतून ठाण्यात आल्याची माहिती डॉ.शर्मा यांनी दिली.हेही वाचा

कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटवर किती प्रभावी?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा