Advertisement

कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटवर किती प्रभावी?

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचे डोस नव्या ओमिक्रॉन व्हायरसला रोखण्यासाठी प्रभावी आहेत का?

कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटवर किती प्रभावी?
SHARES

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचे डोस नव्या ओमिक्रॉन व्हायरसला रोखण्यासाठी प्रभावी आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर तज्ज्ञांनुसार कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी अत्यंत प्रभावी (Covishield and Covaxin) आहेत.

या दोन्ही लसचा फायदा ओमिक्रॉनविरुद्ध लढण्यासाठी होईल, असं शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे. ज्यांनी लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना नव्या व्हेरिएंटपासून (New variant less dangerous) असणारा धोका कमी असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

तज्ञांच्या मते, कोरोनाव्हायरसच्या दोन लस Covaxin आणि Covishield मुळे रुग्णालयात दाखल होणे किंवा मृत्यू देखील टाळता येऊ शकतो.

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या महामारीविज्ञान आणि संसर्गजन्य रोग विभागाचे माजी प्रमुख, ज्येष्ठ शास्त्रज्ञ रमन गंगाखेडकर म्हणाले की, अशी शक्यता आहे की ओमिक्रॉन लसींच्या प्रभावीतेला आव्हान देऊ शकते. तथापि, लस मृत्यू आणि हॉस्पिटलायझेशन टाळू शकते.


ते पुढे म्हणाले की, लोकांनी कोविड-१९ संदर्भाताल सर्व नियमांचं पालन केलं पाहिजे. तसंच पूर्ण लसीकरण केलं पाहिजे. महाराष्ट्र सरकारनं शनिवारी, २७ नोव्हेंबर रोजी संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी सुधारित COVID-19 मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

लस, तसंच यापूर्वी आलेली कोरोनाची लाट लोकांना ओमिक्रॉनपासून संरक्षण देतील, असं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे लस तज्ञ प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितलं.

दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन नियम जाहीर केले. दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची अनिवार्यपणे चाचणी करून त्यांना विलग ठेवण्यात येणार आहे.

दुसर्‍या दिवशी, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) नं महाराष्ट्र टास्क फोर्स सदस्यांना युरोप, यूएसए आणि रशियामधून उड्डाण करणाऱ्या प्रवाशांचे जीनोम सिक्वेन्सिंग अहवालाची माहिती देण्याचे आवाहन केले आहे.हेही वाचा

नव्या व्हेरिएंटचा धोका, लॉकडाऊनबद्दल किशेरी पेडणेकर म्हणाल्या...

दक्षिण आफ्रिकेतून १०००च्या आसपास प्रवासी मुंबईत- आदित्य ठाकरे

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा